जाणीव अस्मितेची साहित्य परिषदे द्वारा महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा

जालना,२९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-जाणीव समितीची साहित्य परिषदे द्वारा महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी व कवी संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. कार्यक्रमाची सुरुवात म. फूलेंच्या प्रतीमा पुजनाने झाली. याप्रसंगी जालन्याचे सुप्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. विजय कुमठेकर हे प्रमुख वक्ते म्हणून तर रमेश देहेडकर जेष्ठ समाजसेवक अध्यक्ष म्हणून लाभले. कुमठेकरांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आपल्या अभिनव वक्तृत्व शैलीने प्रकाश टाकला. फूले माणसांवर प्रेम करणारे होते. फूलेंच्या आयुष्याचा संघर्ष,  त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य यावर त्यांनी भाष्य केले. फूले केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक कसे होते हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून पटवून दिले. 

तसेच याप्रसंगी सामाजिक विषयाशी निगडित सुंदर कवी संमेलन पार पडले. कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ. बी. जे. श्रीरामे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी कैलास भाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक खेडकर यांनी केले.

 रणरणत्या उन्हात बाप माझा नांगर हाकतो 

निथळणाऱ्या घामाने काळ्यामाईची ओटी भरतो 

ही कविता सर्जेराव खरात यांनी सादर केली. तर दिनेश शेळके यांनी 

शिक्षणाचे वाहू लागले वारे 

जो तो घेऊ लागला 

ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 

 राजकारण्याला नसावी कुठली जात ही कविता जीजा वाघ यांनी सादर केली. तर कृष्णा आर्दड यांच्या

मन वेदनांना आता भीती नाही 

पुन्हा असवांची शापित नाही 

या कवितेने रसीकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. मनीष पाटील यांनी 

हाँ अभी अभी लौट आया हूँ शायर की मौत से 

दो फुल चढाया उसकी कब्र पर और उसकी किताब पर 

तर राम गायकवाड यांनी 

शोधू कुठे आता मी 

समजून येत नाही 

अंतरीची काहीली 

दिसून येत नाही 

ही कविता सादर केली. प्राध्यापक पंढरीनाथ सारखे यांनी 

छान झाले इथले  गुढ कळाले 

वय निघून गेले पण इथले सूत्र जुळलेच नाही 

केलास भाले यांनी 

छडी घेऊन वर्गातल्या भिंतीवरच्या नकाशात उतरलो तेव्हा एक विलक्षण बुद्धीवादी  म्हणाला 

काय शोधता सर … 

हरलो कितीदा तरी रणांगण सोडले नाही लढता लढता कधी निष्पापांशी लढलो नाही 

ही डॉक्टर श्री राम सरांनी कविता सादर केली. प्राध्यापक खेडकर सरांच्या

 तो विचारी सांग कोण कामास आले

 फार नाही पण शेवटी चार आले या गझलेने रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिजा वाघ यांनी केली