जालना शहरातील कीर्ती अग्रवाल यांना राष्ट्रीय शेफचे प्रथम मानांकन

जालना,१८ एप्रिल  /प्रतिनिधी :-जयपूर येथील पॅशन ऑफ कुकींग संस्थेतर्फे  आयोजित राष्ट्रीय पातळीवरील खुल्या  पाककृती स्पर्धेत जालना शहरातील सुप्रसिद्ध मास्टर शेफ कीर्ती शिवप्रसाद अग्रवाल यांनी प्रथम मानांकन पटकावले आहे. 


जयपूर ( राजस्थान) येथील राजलक्ष्मी हॉटेल मध्ये  रविवारी महाअंतिम फेरी झाली.  संपूर्ण भारतातील पाच फेऱ्यांतून सहभागी सहाशे पैकी  वीस स्पर्धकांची महाअंतिम फेरी साठी निवड करण्यात आली.अंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त दहा पाकतज्ञ परिक्षकांनी निरिक्षण केले. कीर्ती अग्रवाल यांनी महाअंतिम फेरीत   पंधरा राज्यांतील  वेगवेगळ्या तब्बल 57 पाककृती तयार केल्या.त्यांच्या लक्षवेधी पाककृती  परिक्षकांना भावल्या सुक्ष्म निरिक्षणा अंती  कीर्ती अग्रवाल यांच्या पाककृतींची  प्रथम क्रमांकासाठी घोषणा केली. गॅस शेगडी, शेफ कोट, स्मृती चिन्ह, व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून संजय सारडाना, कर्नल सुधीर गुप्ता, यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या वेळी संयोजक शशी कपूर, अनुज मोदी, अनुज सारा यांची उपस्थिती होती.

दरम्यान सन 2020 मध्ये झालेल्या ऑनलाईन स्पर्धेत  कीर्ती अग्रवाल ह्या विजेत्या ठरल्या होत्या. त्या पुरस्कारांचे ही वितरण करण्यात आले. पाककलेतील राष्ट्रीय पातळीवर मानाचे प्रथम पारितोषिक मिळवल्या बद्दल कीर्ती अग्रवाल यांचे उडान ग्रुप सह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.