पोलिस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षा शनिवारी 

अकरा परीक्षा केंद्र;३६१४ उमेदवार; ४५६ कर्मचारी

छत्रपती संभाजीनगर ,२९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दि.२ रोजी पोलिस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी अकरा परीक्षा केंद्रांवर ३६१४ उमेदवारांची परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४५६ अधिकारी- कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.

परीक्षा केंद्रनिहाय उमेदवार संख्या याप्रमाणे-

१.      शासकीय महाविद्यालय, कला व विज्ञान सुभेदार विश्रामगृहजवळ विश्वास नगर- ४०८.

२.      मौलाना आझाद महाविद्यालय आर्टस, विज्ञान आणि वाणिज्य, (विज्ञान इमारत)  – २८८,

३.      डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय कला व वाणिज्य, नागसेनवन-३१२,

४.      सरस्वती भूवन महाविद्यालय विज्ञान औरंगपुरा- २८८,

५.      सरस्वती भूवन मुलांची शाळा,औरंगपुरा- ४३२,

६.      सरस्वती भूवन महाविद्यालय कला व वाणिज्य- ४३२,

७.      विवेकानंद कला व सरदार दिलीपसिंग वाणिज्य महाविद्यालय – ३१२

८.      विवेकानंद विज्ञान महाविद्यालय – ३१२

९.      शिवाजी हायस्कूल, खोकडपुरा- २४०,

१०.  मिलिंद महाविद्यालय ऑफ विज्ञान – ३१२,

११.  हॉली क्रॉस मराठी उच्च माध्यमिक शाळा – २८८,

अशा एकूण ३६१४ परीक्षार्थींच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ४५६ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

परीक्षार्थींसाठी सुचनाः-

परीक्षार्थींनी परीक्षेस येतांना ओळखीचा पुरावा (स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी कोणतेही एक) परीक्षा कक्षात उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉलपेन, ओळखपत्र, ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही. तसेच डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लू टूथ, कॅमेरा फोन अन्य तत्सम संदेशवाहक उपकरण, इलेक्र्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास मनाई आहे,असेही उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.