छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांची  सदिच्छा भेट

छत्रपती संभाजीनगर ,९ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (CSMSS) येथे मराठवाडा शिक्षक मतदारसंघ आमदार   विक्रम वसंतराव काळे आणि  छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. विकास मिना यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमानिमित्त सदिच्छा भेट दिली, यावेळी त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव श्री. पद्माकरकाका मुळे यांनी केला.
       यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, मानव संसाधन अधिकारी श्री. अशोक आहेर आणि जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील उपस्थित होते.