कर्णपुरा नवरात्र उत्सवाला सुरुवात

संस्थापक अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते महाआरतीने सुरुवात

छत्रपती संभाजीनगर,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शहराची ग्रामदेवता लाखो भक्तांची श्रद्धास्थान असलेल्या कर्णपुरा देवीची राज्याचे विरोधी पक्षनेते तथा संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती तसेच घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली.


याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले,उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह,उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, पोपटराव दानवे,अनिल दानवे, उपविभागप्रमुख तथा प्रसिद्धीप्रमुख अभिजीत पगारे, संतोष दानवे,जगन्नाथ दानवे,अंकुश दानवे,धर्मराज दानवे, ओंकार देवतवाल,संजय बारवाल, पराग कुंडलवाल, आकाश दानवे, बद्रीनाथ ठोंबरे, प्रभात पुरवार, नारायण कानकाटे उपस्थित होते.

पंचक्रोशित कर्णपुरा देवी प्रसिद्ध असून येथील यात्रेला ४०० वर्षाचा इतिहास आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात लाखो भाविक भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात, नवसाला पावणारी देवी म्हणून देवीची ख्याती आहे,हजारो भाविक नवरात्रीच्या काळात नवस फेडण्यासाठी येत असतात.
नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज सकाळी ७:०० वाजता व सायंकाळी ६:०० वाजता आरती होणार असून अष्टमीला होम हवन होणार आहे. भाविकांनी शांततेत देवीच्या दर्शनासाठी यायचे आहे, आपली स्वतःची, ज्येष्ठांची, लहान मुला बाळांची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी दानवे यांनी केले.