समृद्धी महामार्गावरील उच्चदाब वाहिनीचे काम स्थगित; वाहतुक पूर्ववत

छत्रपती संभाजीनगर,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-  हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर करावयाचे नियोजित पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम स्थगित करण्यात आले असून त्याकरीता करण्यात येणारा वाहतुक मार्गातील बदलही स्थगित करण्यात आला असून वाहतुक पूर्ववत सुरु राहिल असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्याचे नियोजन होते. तथापि, अपरिहार्य कारणांमुळे हे काम तूर्त स्थगित झाले असून यानिमित्त पहिला टप्पा दि.10 ते 12  व दुसरा टप्पा दि.25 व 26 या कालावधीत  त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतुक वळविण्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, काम स्थगित झाल्याने वाहतुक पूर्ववत सुरु राहिल, असे कळविण्यात आले आहे.