दुष्काळाच्या छायेत मराठवाड्यात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक :विविध योजनांसाठी ५५ हजार कोटींचे प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर,१५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद मुक्तिदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित मंत्रिमंडळ बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर सजविण्याची एका बाजूला घाई सुरू आहे, तर दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान पंधरा मोर्चे निघतील, असे सांगण्यात येत आहे. सात वर्षाच्या कालखंडानंतर आज, शनिवारी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे विविध प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते सुमारे ५५ हजार कोटींच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीतून ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे ‘पॅकेज’ देण्याची तयारी सुरू असून, सचिव स्तरावर त्यांच्या मंजुरीसाठी लगबग सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सुरू असणारे उपोषण सुटल्यामुळे तरतुदीतून मतपेढीचे गणित जुळविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होईल, अशी टीका आता सुरू झाली आहे. या बैठकीत मराठवाड्याला राज्य सरकारकडून अनेक अपेक्षा देखील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कडून या भागाला अनेक अपेक्षा देखील आहेत. या बैठकीत सुमारे 40 हजार कोटींच्या योजनांचे पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषि महाविद्यालय यांचा समावेश आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबतही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होतील अशी अपेक्षा आहे. सात वर्षांनंतर मराठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. आगामी काळात राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असल्याचे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा होणार, हे अपेक्षीतच आहे. मात्र, त्यात मराठवाड्याच्या पदरी काय पडणार? असा प्रश्न आहे.

२०१६च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडाच्या विकासाला उभारी देण्यासाठी ४९ हजार २४८ कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. मराठवाड्याचा आरोग्य, सिंचन, रस्ते यासह विविध क्षेत्रांतील अनुशेष अद्याप भरून काढणे बाकी आहे. त्यासाठी भरीव अशी तरतूद करण्यासाठी, ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ओरड केली जात आहे. मराठवाड्यातील प्रश्नांवर चर्चा करून ठोस तरतूद करण्यासाठी येथे वर्षातून किमान एकदा तरी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी नेहमीची आहे. परंतु, अपवाद वगळता छत्रपती संभाजीनगरमध्ये नियमित बैठका काही झाल्या नाहीत.

दळणवळण, सिंचन, कृषी, वैद्यकीय महाविद्यालय, गरवारे क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणे, रिंग रोड बनविण्यासह जलसंपदा खात्याने विभागात १,३११ कोटी खर्चातून सहा नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव बैठकीसमोर ठेवले जातील, असे समजते. तब्बल पावणेअकरा कोटी खर्चाच्या ११ जुन्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचे प्रस्ताव आहेत. विभागीय प्रशासनाने जिल्हा परिषद अंतर्गत शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण विभागाचे १,८०० कोटींचे स्वतंत्र प्रस्ताव दिले आहेत. ७३ प्रस्ताव प्रशासकीय असून, सरकारमध्ये सत्तेत असलेल्या खासदार, आमदारांचे स्वतंत्र प्रस्ताव सीएमओ कार्यालयाकडे गेल्याचे सांगण्यात आले आहे. क्रीडा, उद्योगासाठी अनुक्रमे ६०० व २५० कोटींच्या निधीचे प्रस्ताव असल्याचे समजते. 

वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार हे मुक्तिसंग्रामाचे कार्यक्रम आणि मंत्रिमंडळाची बैठक याचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. मंत्रिमंडळ बैठकीवर  दुष्काळाचे सावट कायम आहे.  मराठवाडय़ातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. पाणीटंचाईचे मोठे संकट आ वासून उभे आहे. या पार्श्वभूमीवर तरतुदीतील महत्त्वाचा वाटा सिंचन आणि पाणीपुरवठा योजनांवर होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. निजामकालीन शाळा, अंगणवाडय़ा आणि ग्रामपंचायतींच्या अशा हजारहून अधिक इमारतींसाठी निधी मागण्यात आला आहे. अर्धवट सिंचन प्रकल्प आणि नदीजोड प्रकल्पासाठीही मोठय़ा तरतुदीची मागणी प्रस्ताव म्हणून पुढे ठेवण्यात आली असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठय़ासह मराठवाडय़ाला कोकणचे पाणी, म्हैसमाळ प्राधिकरणाला दिलेल्या ४५३ कोटींचा उडालेला बोजवारा यांसह विविध निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘घे पॅकेज’ नावाने आंदोलन केले.

मराठवाड्यास अंदाजे काय मिळेल?
कृषी : ५०० ते ६०० कोटी
सिंचन प्रकल्प : २० ते २२ हजार कोटी
बांधकाम विभाग : १० ते १२ हजार कोटी
वैद्यकिय शिक्षण : ५०० कोटी
क्रीडा संकुलांसाठी : ६०० कोटी
उद्योग सुविधांसाठी : २०० ते ३०० कोटी
महापालिकांसाठी : १ हजार कोटी
जिल्हा परिषद : २ हजार कोटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा(सुधारित)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दि.१६ रोजी सकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.१६ रोजी सकाळी ८वा.४५ मि. नी औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण.सकाळी ९ वा.औरंगाबाद शहरातील विविध प्रकल्प इमारतींचे ऑनलाईन भूमीपुजन / लोकार्पण कार्यक्रम –

१) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे ई भूमीपुजन,

२) सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनांचे ई भूमीपुजन,

३) हसूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई लोकार्पण.

४) सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युड्रामा फिल्म व पोस्टल कव्हर विमोचन

५) औरंगाबाद जिल्ह्याच्या भविष्यातील वाटचाल व प्रगतीबाबत मंथन बैठक,

स्थळ:- वंदे मातरम सभागृह.

सकाळी १०.४० वा.मोटारीने स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण.

सकाळी १०.४५ वा.स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबाद येथे आगमन.

सकाळी १०.५० वा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण.स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय.

सकाळी १०.५५ वा.छत्रपती संभाजीनगर जिल्हा / विभाग / तालुका नामकरण बोर्डाचे अनावरण.स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय.

दुपारी ११.०० वा.राज्य मंत्रीमंडळ बैठक.

स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय. मंत्रीमंडळ

बैठकीनंतर लातूर येथील शासकीय निवासी शाळेच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन,स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय.

दुपारी ०२.०० वा.पत्रकार परिषद.स्थळ :- अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर, स्मार्ट सिटी कार्यालय जवळ.

दुपारी ०३.०० वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.

दुपारी ०३.१५ वा.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव.

सायं. ०५.०० वा.मोटारीने गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर, औरंगाबादकडे प्रयाण.

सायं. ०५.१५ वा.गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन.

स्थळ:- चेतक घोडा जवळ, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर, औरंगाबाद.

सायं. ०५.३० वा.मोटारीने निराला बाजार, औरंगाबादकडे प्रयाण.

सायं. ०५.४० वा.गणेश महासंघ कार्यालयाचे उद्घाटन.

स्थळ:- निराला बाजार, औरंगाबाद.

सायं. ०५.५० वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.

सायं.०६.०० वा.शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

रात्री ०८.२० वा.मोटारीने क्रांती चौक, औरंगाबादकडे प्रयाण.

रात्री ०८.३० वा.’गर्जा मराठवाडा’ कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ:- क्रांती चौक, औरंगाबाद.

सोयीनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.

रविवार, दि. १७ रोजी सकाळी ०८ ४५. वा.मोटारीने सिध्दार्थ उद्यान, औरंगाबादकडे प्रयाण.

सकाळी ०९.०० वा.मुक्तिसंग्राम ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम.

स्थळ:- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद,

सकाळी ०९.३० वा.मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्रप्रदर्शनीस भेट.

स्थळ :- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद,

सकाळी ०९.४५ वा.ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मीनारायण मोहनलाल जैस्वाल यांच्या तैलचित्राचे अनावरण.

स्थळ:- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद.

सकाळी १०.०० वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.

सकाळी १०.१५ वा.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव

दुपारी ०१.३० वा.मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.

दुपारी ०२.०० वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने श्रीनगर, जम्मू-कश्मिरकडे प्रयाण.