आंतरवाली सराटीत लाठीमार; औरंगाबाद खंडपीठात याचिका

छत्रपती संभाजीनगर,९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जालन्यातील आंतरवाली सराटीत १ सप्टेंबर रोजी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. याचिकेत लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, नुकसान झालेल्या आंदोलकांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली असून, सुनावणी सोमवारी अपेक्षित असल्याची माहिती अ‍ॅड. देविदास आर. शेळके यांनी दिली. ‘पार्टी इन पर्सन’ अशी ही याचिका सादर करण्यात आल्याचे अ‍ॅड. शेळके यांनी सांगितले.