“…तर मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळेल”, पंकजा मुंडेंचं मोठं विधान

फलटण,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत प्रत्येक जण आपली मतं मांडत आहे. सरकारने मात्र जालना येथे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याकडे थोडा वेळ मागितला असून जरांगे यांनी फक्त ४ दिवस पुरे असल्याचं सांगत. उपोषणावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.

अशातच आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला आमचं मत विचारण्यापेक्षा आरक्षणासाठी जी समिती आहे, त्यांना यावर त्यांचं मत विचारा. मराठा समाजाच्या आरक्षणाला न टिकविण्यासाठी या समितीनं जो मसुदा कायदा तयार केला. तो जबाबदार आहे. जर तो मसुदा नीट असेल, तर मराठा समाजाला थोडे नाहीतर शंभर टक्के आरक्षण देता येईल”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमाचे फलटण येथे आगम झाले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे जल्लोषी करून स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी काही पत्रकारांशी संवाद साधला. जालन्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांबाबत जो प्रकार झाला. त्या घटनेची खडसावून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मुंडे म्हणाल्या, “शिवशक्ती परिक्रमेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोक प्रेमाने स्वागत करत आहेत व अत्यंत सन्मानाने पाहुणचार देखील करत आहेत”, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.