पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूत म्हणुन जनतेची सेवा करणार-केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद,१९ ऑगस्ट /प्रतिनिधी:- पंतप्रधान मोदी यांनी गेल्या सात वर्षांत ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेतुन विकास केला. त्याचबरोबर दहशतवाद्यांचा बीमोड करत देश सुरक्षितही ठेवला. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा दूत म्हणून आपण जनतेची सेवा करणार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरूवारी परभणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.

Image

केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेचा आशिर्वाद घेत नांदेड जिल्ह्यातुन हिंगोली, परभणी जिल्ह्यात आले असताना सर्वसामान्य जनता, शेतकर्‍यांनी रस्त्यावर येवुन यात्रेचं उत्स्फुर्त स्वागत केलं. ठिकठिकाणी लावलेले बॅनर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कराड मंत्री झाल्याचा आनंद त्यामुळे सर्वत्र वातावरण भाजपमय दिसत आहे. 

Image

          यावेळी आ. मेघना बोर्डीकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, यात्रा संयोजक मनोज पांगारकर, सह-संयोजक प्रविण घुगे, माजी आमदार मोहन फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम आदी उपस्थित होते.

          डॉ.कराड म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी ग्रामीण भागामध्ये वीज, पाणी, रस्ते, पक्की घरे, स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी गॅस अशा मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांमुळे हे शक्य झाले आहे. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सामान्य माणसाला विकासाची फळे मिळू लागली आहेत. मराठवाड्याच्या विकासासाठी मोदी सरकारने व फडणवीस सरकारने भरभरून निधी दिला. मात्र, महाविकास आघाडी सरकार सूडाने वागून मराठवाड्याच्या विकासात खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहे असेही डॉ. कराड म्हणाले.

Image

परभणीत पत्रकारांच्या सोबत संवाद साधताना मंत्री डॉ.भागवत कराड यांनी जनआशिर्वाद यात्रेची भुमिका आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना पत्रकारांना सांगितली. आम्ही मंत्री झालो पण विकास प्रत्यक्ष जावुन समजुन घ्यावा आणि आपल्या कामाला सुरूवात करताना ज्या भागातुन आपण मंत्री झालो तेथील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, अठरापगड जातीधर्माच्या लोकांच्या मध्ये जावुन आशिर्वाद घ्यावेत आणि कामाला सुरूवात करावी त्यासाठी यात्रा काढली असुन बीड जिल्ह्यातील स्व.गोपीनाथराव मुंडे गोपीनाथ गडावरून यात्रेला प्रारंभ केला. नांदेड जिल्ह्यात उत्स्फुर्त स्वागत झालं. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरात भुतो न भविष्यति असं स्वागत यात्रेचं सर्वसामान्य जनतेनं केल्याचे त्यांनी पत्रकाराना सांगितले.

Image

केंद्र सरकारच्या कारभारावर सामान्य माणुस समाधानी आहे. पंतप्रधान मोदी यांना सबका साथ, सबका विकास या भावनेतुन विकास काय असतो? आणि देश कसा समृद्ध करून सुरक्षित ठेवावा लागतो?हे मागच्या सात वर्षात जगाच्या पाठीवर दाखवुन दिलेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामान्य जनतेसाठी काम करणारं कोणतं सरकार असेल? तर केवळ केंद्रातील मोदी सरकार असल्याचे ठणकावुन त्यांनी सांगितले. मी मराठवाड्याचा सुपुत्र तीस वर्षापासुन सर्व जिल्ह्यात जनसंपर्क ठेवत काम करत आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर सर्व जिल्ह्यात पोहोचलो. वैधानिक विकास मंडळावर काम केल्यामुळे विकासाची कल्पना मला आहे. सर्वसामान्य कुटुंबापैकी मी आहे. मला मिळालेली संधी मराठवाड्याच्या विकासासाठी कामी आणल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी ठणकावुन सांगितले. परभणी जिल्ह्यातुन विकासाचे आलेले प्रस्ताव राज्य सरकारमार्फत मागे न ठेवता भरीव निधी दिल्याशिवाय राहणार नाही. हे सांगताना महानगरपालिका पाणीप्रश्नासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 160 कोटीचा मोठा निधी दिला. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार सुडाने वागत असुन विकासात खिळ घालत असल्याचा आरोप त्यांनी लावला.

Image

आगामी काळात सर्वसामान्य जनतेने मला आशिर्वाद द्यावेत. मी काय करेल? हे माझ्या कामातुन मराठवाड्याला दिसल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला आ.सौ. मेघना बोर्डीकर,महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे मा.अध्यक्ष प्रवीण घुगे ,ओबीसी मोर्च्या चे प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे,मा.आ.मोहन फड,मनोज पांगारकर, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,रामकिशन रवंदळे,विठ्ठलराव रबदडे, आदी मान्यवरांसह जिल्हा सरचिटणीस संजय रिझवानी, मोहन कुलकर्णी,अनुप शिरडकर,उपस्थित होते.