मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार ,हवेत गोळीबार २३ पुरुष तर दोन महिला जखमी

जालना ,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :-अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलन्यादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. तसेच या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर दगड फेक देखील करण्यात आली आहे. या दगडफेकीत पोलिसांसह आंदोलक देखील जखमी झाले आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासह इतर मागण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. दरम्यान, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंबड तालुक्यातील २२ गावांमध्ये बंद पाळण्यात आला. तसेच बीडच्या गेवराई तालुक्यातील अनेक गावांनी बंद पुकारुन या आंदोलनाच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटी गावापर्यंत दुचाकी रॅली काढली.लाठी हल्लात तसेच छर्याच्या गोळीबारामध्ये २३ पुरुष तर दोन महिला जखमी झाले आहेत. 


या लाठी हल्लात तसेच छऱ्यांच्या गोळीबारामध्ये २३ पुरुष तर दोन महिला जखमी झाले आहेत. यातील अनेक तरुणांना शरीरात छर्रेच्या गोळ्या लागल्यामुळे अनेक तरुण जखमी झालेले आहेत या सर्व जखमी आंदोलकावर वडीगोद्री येथील खाजगी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासह इतर मागण्यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु करण्यात आलं. यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईलद्वारे मनोज जरांगेंशी संवाद साधत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार मराठा आंदोलन संदर्भात सकारात्मक पावले टाकत असल्याचे  सांगितले  होते .

यावेळी जरांगे यांनी आतापर्यंत आश्वासनांशिवाय काहीच हाती पडत नसल्याचे  सांगत उपोषणावर ठाण राहण्याचा  निर्णय घेतला होता. यानंतर चौथ्या दिवशी मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांचं उपोषण सुरु आहे. उपोषण कर्त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी सरकारचे गुरुवार रात्रीपासूनच प्रयत्न सुरु आहेत. शुक्रवारी दुपारीही मोठ्या प्रमाणावर फोजफाट्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांना उपचार घेण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते.

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मागील तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकार्‍यांना आज (दि.१) रोजी जालना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधूर आणि लाठीचार्ज केला. या घटनेनंतर अंतरवाली सराटी गावात तणावपूर्ण वातावरण असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.जालना पोलिसांनी उपोषणकर्त्यांना पांगविण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात २३ पुरुष तर २ महिला जखमी झाले आहेत. यातील अनेक तरुणांच्या शरीरात छर्रे घुसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमी आंदोलकांवर वडीगोद्री येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आक्रमक आंदोलकांनी गोळीबार केल्याने पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत आठ ते नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यात एका पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. पीएसआय गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि.२९ रोजी शहागड येथे आंदोलन झाल्यानंतर त्या दिवसापासूनच मनोज जरांगे हे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते.आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला, असे पोलिसांनी म्हटले आहे. दगडफेकीत एक पोलिस जखमी झाला आहे.  पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्वक बनले.

छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जाणाऱ्या २ आणि बीडकडून संभाजीनगरकडे जाणारी १ एसटी बस फोडल्याची माहिती मिळत आहे.सोलापूर- धुळे हायवेवर वडीगोद्री येथे ५ एसटी बस फोडण्यात आल्या. शहागड बसस्थानकामध्ये ४ बसवर तर राक्षसभुवन फाट्यावर खासगी बसवर दगडफेक करण्यात आली. गहीनाथ नगर येथे ट्रक पेटवण्यात आला. प्रकृती बिघडल्याने आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

आमदार राजेश टोपे यांची भेट 

सकल मराठा समाज आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज,लोखंडी छर्रे,प्लॅस्टिक बुलेट व अश्रूधुरांचा वापर केल्यानंतर मौजे अंतरवाली सराटी ता.अंबड येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.जखमी पुरुष व महिला आंदोलकांना साई हॉस्पिटल,वडीगोद्री,उपजिल्हा रुग्णालय,अंबड व जिल्हा रुग्णालय,जालना येथे जाऊन जखमीवर योग्य उपचार करणेबाबत डॉक्टरांशी चर्चा करून सूचना दिल्या.

मराठा समाजाला दडपण्याचा प्रयत्न केल्यास तितक्या ताकदीने उभा राहिल

लाठीचार्ज प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठा समाजासोबत राज्य सरकार बोलाचाच भात आणि  बोलाचीच कढी या उक्तीप्रमाणे वागत आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्य सरकार दडपू पाहत आहे. मात्र मराठा समाजाचा आक्रोश दडपणार नसून तो अजून ताकदीने उभा राहील असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटा या गावात गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलकांवर जिल्हा पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रतिनिधित्व करत असून त्यांनी शिफारस करून मोदी सरकाराला संसदेत ठराव आणून मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात असलेल्या ५०%  अटीची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.

तसेच जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी सर्वस्वी सरकार जबाबदार असून पोलीस अधीक्षक यांच्यावर सरकारने निलंबनाची कारवाई केली पाहिजे.यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करा,आणि आंदोलकांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा शिवसेना पद्धतीने राज्य सरकारला धडा शिकवू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान,अंतरवाली सराटा गावात  सुरू असलेल्या आंदोलनातील माता भगिनींवर पोलिसांनी लाठी चार्ज केला आहे. दीड वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका खारीच केली. या दीड वर्षात राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रकरणी काय निर्णय घेतला हा माझा प्रश्न आहे. फक्त शासनाच्या सह्याद्री निवासस्थानी मराठा आरक्षण संदर्भात कोणताही तोडगा निघणार नाही अशा बैठका घेण्यात आल्या ज्यातून या प्रश्न प्रकरणी काही निर्णायक गोष्टी साध्य झाल्या नाहीत, अशी माहिती सुद्धा दानवे यांनी दिली.