विजय स्मारक येथे १०८ फूट उंच राष्ट्र ध्वज फडकवला

छत्रपती संभाजीनगर,२३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर फर्स्ट (सिएसएन फर्स्ट) च्या पुढाकाराने विजय स्मारक येथे आज फ्लॅग फाउंडेशन इंडिया संस्थे द्वारे १०८ फूट उंच राष्ट्र ध्वज फडकवला गेला.

दर वर्षी २३ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणाऱ्या  आवा दिनाच्या (Army Wifes Welfare Association) निमित्ताने आज हे ध्वजारोहण झाले.३६ x २४ फूट राष्ट्र ध्वज आज सकाळी ११:१५ मिनिटांनी वीर माता श्रीमती कमला खरात यांच्या  हस्ते फडकावला गेला. या प्रसंगी औरंगाबाद छावणीचे प्रमुख ब्रिगेडियर के एस नारायणन व फ्लॅग फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर जनरल अशीम कोहली (निवृत्त) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मेजर जनरल कोहलींनी या वेळी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी सिएसएन फर्स्टचे कौतुक केले. राष्ट्र ध्वजा संदर्भात असलेल्या अनेक गैरसमजां बद्दल निरसन केले. राष्ट्र ध्वजाला प्रत्येक नागरिकाने आयुष्यात सर्वोच्च स्थान द्यावे असे आवाहन केले.

सैन्य अधिकारी, वीर माता, माजी सैनिक, शाळकरी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.एडम कमांडंट कर्नल डी एस ओबेरॉय, छावणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, सिएसएन फर्स्टचे माजी अध्यक्ष ऋषी बागला, माजी अध्यक्ष मानसिंग पवार, सह सचिव बाळकृष्ण भाकरे, कोषाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी, संचालक हबिब शेख, आर्किटेक्ट किरण राव, कार्यवाहक गणेश काटे, कार्यकारी सचिव हेमंत लांडगे, ललित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.