काँग्रेसची वर्किंग कमिटी जाहीर:पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांना मोठा झटका

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,यशोमती ठाकूर,प्रणिती शिंदे यांचा या कमिटीत समावेश

मुंबई: काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील ८ नेत्यांना सामील केले आहे. मात्र गेल्या समितीमध्ये सामील असलेले वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना या कमिटीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. सोबतच नव्या वर्किंग कमिटीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचाही समावेश नाही.

काँग्रेसची वर्किग कमिटी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही कमिटी जाहीर केली आहे. नाराज असलेसे राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचा देखीस या कमिटीत समावेश करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील नेत्यांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा देखील या कमिटीत समावेश आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या वर्किंग मिटीतील नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली . यात काँग्रेस नेते सचिन पायलट, शशी थरुर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, पी चिदंबरण, अशोक चव्हाण, दिग्विजय सिंग, आनंद शर्मा, अल्का लांबा, यशोमती ठाकूर, पवन खेरा, प्रणिती शिंदे, पवन खेरा, गणेश गडियाल, रणदिप सिंग सुरजेवाला, तारिक अनवर, के सी वेणूगोपाल, गौरव गौगाई यांच्यासह ३९ नावांचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी सरळ संगमनेर येथे आले होते. त्या वेळेस वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र समोर आले होते. अशातच थोरात मात्र निष्ठेने पक्षाशी एकनिष्ठ राहिले. याशिवाय थोरात यांनी गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाते. त्यावेळेस राहुल गांधी संगमनेर येथे थांबले होते. तेव्हा ते म्हणाले होते की थोरात यांना मोठी संधी मिळेल. पुढेही तसेच घडले.