छत्रपती संभाजीनगरमध्ये आज इंडस्ट्रियल मीट:एक लाखांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर,१७ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत शुक्रवार दि.18 रोजी ‘इंडस्ट्रियल मीट’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत,असे उपआयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय सु.द. सैंदाणे यांनी कळविले आहे. यात 238 कंपन्यांशी सामंजस्य करार झाले असून त्याद्वारे एक लाखांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद व नाशिक विभागाच्या वतीने ‘इंडस्ट्रियल मीट’चे आयोजन औरंगाबाद येथे शुक्रवार दि.18 रोजी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर (MASSIA), श्रीमती रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृह, पी-25, चिकलठाणा, एमआयडीसी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ  भागवत कराड, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, आयुक्त्ाय डॉ.रामास्वामी एन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत कळविण्यात आले आहे.

उद्योजक आणि उमेदवार एकाच व्यासपीठावर

महाराष्ट्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजना राबवण्यिात येतात, त्यापैकी उद्योजक व नोकरी इच्छुक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने उद्योजकांकडील रिक्त पदासाठी मुलाखती आयोजित करुन तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात.

अनेक सामंजस्य करार

राज्यातील बेरोजगार उमेदवारांना अधिक रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचे मार्फत 16 नोव्हेंबर 2022 रोजी मा.राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्री यांचे उपस्थितीत नामांकित 44 इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज समवेत तसेच, 20 एप्रिल 2023 रेाजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री, अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व आयुक्त यांच्या उपस्थितीत 16 उद्योजक व प्लेसमेंट एजन्सीज समवेत सुमारे 1 लक्ष 35 हजार नोकऱ्या या उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. तसेच दि.09 जून 2023 रोजी पुणे येथे मा.राज्यपाल, कौशल्य विकास मंत्री यांचे उपस्थितीत 141 नामांकित इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज समवेत सामंजस्य् करार केलेले असुन याद्वारे 1 लाखापेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच दि.15 जुलै 2023 रोजी ठाणे येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचे उपस्थितीत नामांकित 289 इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज समवेत सामंजस्य करार केलेले आहेत. अशा एकूण 490 सामंजस्य करारनाम्याद्वारे सुमारे 4.49 लक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत.

238 कंपन्यांशी सामंजस्य करार आणि एक लाखांहून अधिक रोजगार संधी

औरंगाबाद व नाशिक विभागाच्या वतीने जिल्ह्यात दि.18 रोजी इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागातील एकूण 111 व नाशिक विभागातील एकूण 127 अशा एकूण 238 नामांकित इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज यांनी आज अखेर शासनासमवेत सामंजस्य करार केलेले असुन याद्वारे एक लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सर्व औद्योगिक आस्थपना, प्रतिनिधी, औद्योगिक संघटना प्रतिनिधी, प्लेसमेंट एजन्सी प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन उपआयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय सु.द. सैंदाणे यांनी  केले आहे.