‘चला जाणुया नदीला’उपक्रमात खाम नदीचे पुर्नज्जीवन करण्यात येणार

छत्रपती संभाजीनगर,१० ऑगस्ट  /प्रतिनिधी :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जाणुया नदीला” या अभियानत खाम नदीचे पुर्नज्जीवन व विकासासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या समवेत इकोसत्व या सामाजिक संस्थेमार्फत खाम नदीचे पुर्नज्जीवन करण्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

खाम नदीच्या पुर्नज्जीवन व विकासासाठी “चला जाणुया नदीला” या अभियानात नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात असलेला गाळ काढला जाणार आहे. तसेच बांध बंदीस्तीची, पाणलोटची कामे, नदी काठावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.तसेच या सोबतच ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाला वृक्ष लागवड करण्याची जोड देण्यात येणार आहे.