महाआरोग्य शिबिरातुन गरजूंना आरोग्य सुविधाचा लाभ द्यावा-जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

छत्रपती संभाजीनगर,१० ऑगस्ट  /प्रतिनिधी :- अयोध्या मैदान, रेल्वे स्टेशनजवळ 13 ऑगस्ट 2023 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये वाहतुक, स्वच्छतागृह, भोजन, आसन व्यवस्था येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडून गरजुंना महाआरोग्य शिबिरातुन सुविधेचा लाभ द्यावा, असे निर्देश आरोग्य यंत्रणा व संबंधिताला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना दिले.

आरोग्य सर्वेक्षण केल्यानंतर विविध तपासण्या आणि उपचार करण्यासाठी आरोग्य शिबिरात व्यवस्था करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व सुविधांचा आढावा, जिल्हाधिकारी यांनी घेतला. एम.आय.डी.सी., राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विद्यार्थी, स्वयंसेवक, होमगार्ड, पोलीस, आरोग्य कर्मचारी याबरोबरच संबंधित विभागाना पाण्डेय यांनी सुचना केल्या. महानगरपालिका, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनांच्या समन्वयातून महाआरोग्य शिबिराची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय भोकरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा, कर्करोग रुग्णालयाचे डॉ.गोसावी यांची उपस्थिती होती.

महाआरोग्य शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणीनंतर शिबिरात येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना मोबाईलद्वारे संदेश पाठवून अवगत करावे. आरोग्य सेविका आणि आशा कर्मचाऱ्यांच्या मार्फत कुटुंबातील व्यक्तींच्या आजाराचा अहवालानुसार तपासणीचे नियेाजन करावे. जेणेकरुन गरजु नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ मिळेल.

या शिबिरात डॉक्टर, नर्स व आशासेविका यांचा समावेश असणार आहे. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. गरजू नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ द्यावा असे पाण्डेय यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करावी, या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.