जालना जिल्ह्यात 100 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि.20 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 78 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.RT-PCR तपासणीव्दाारे ७३ व्यक्तीचा व अँटीजेनतपासणीद्वारे २७ व्यक्तींचा अशा एकुण १०० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण रुग्ण-13697 असुन सध्या रुग्णालयात-198 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4752, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-220 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-47487 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-100 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7388 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-39556, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-424, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4207

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-54, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-4152 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-80, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-488, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-198,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-82, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-78, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-5686, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1513 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-85508, मृतांची संख्या -189.

सिंदखेडराजा शहरातील ८० वर्षीय पुरुष व बाजीउम्रद ता. जालना येथील ४४ वर्षीय महिला अशा एकुण दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 12 नागरिकांकडून 2 हजार 250 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 5 हजार 271 नागरीकांकडुन 11 लाख 3 हजार 324 रुपये एवढा दंड वसुल करण्याात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *