वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात सिकलसेल आजार तपासणी व रुग्णांना मार्गदर्शन

वैजापूर,१९ डिसेंबर /प्रतिनिधी :- सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह निमित्त  येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवार ( ता.१४) रोजी गरोदर माता व इतर रुग्णाच्या रक्ताची तपासणी सिकलसेल तंत्रज्ञ लक्ष्मीकांत दुबे यांनी केली.

जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी सिकलसेलबाबत मार्गदर्शन करून या आजाराची लक्षणे विशद केली. हा आजार अनुवांशिक असल्याने गरोदर मातांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.सप्ताह सुरू झाल्यापासून आजपर्यत ५८ रुग्णांनी या मोफत तपासणीचा लाभ घेतला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ,योगेश राजपूत, डॉ.सिद्धार्थ इंगोले, निलेश चाफेकर, परिचारिका उर्मिला जाधव, आशा गिरी, रवि विणकर, पंकज कांबळे, संजय पवार (जिल्हा कार्यक्रम अधिकारी ) मुख्य आय सी टी विभाग प्रमुख विजय पाटील संजय शिराळे व इतर पदाधिकारी  उपस्थित होते.सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले शेवटी लक्ष्मीकांत दुबे यांनी आभार मानले.