प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे दीर्घ आजाराने निधन

छत्रपती संभाजीनगर,५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी मराठवाड्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. 

प्रतापराव बोराडे यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1942 रोजी पाटोदा येथे झाला. शालेय जीवनात ते राष्ट्र सेवा दलाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांची पुढील वाटचाल समाजवादी विचारसरणीत झाली. शालेय जीवनापासून त्यांना वाचनाची आवड होती, ती त्यांनी कायम जोपासली. 1955 साली नूतन विद्यालय, सेलू येथे सहावी पासून पुढचे शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून अभियांत्रिकीही पदवी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई येथून प्लॅस्टिक इंजिनियरिंग मध्ये पदविका. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर मधीन एम.ई. ची पदवी मिळवली. 

शालेय आयुष्यातच ते राष्ट्र सेवादलाच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांची वाटचाल समाजवादी विचारांप्रमाणे झाली. आयुष्यातला प्रत्येक निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतला व प्रचंड मेहनत घेऊन तो यशस्वी करून दाखवला. पवई आयआयटीसारख्या नामवंत संस्थेतून प्लॅस्टीक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांना नामवंत कंपनीत रुजू होण्याची संधी होती. मात्र ते विचारपूर्वक गुजरातमधील वापीसारख्या ग्रामीण भागातील एका नवीन कंपनीत रुजू झाले. कंपनीतील मशिनरी उभारणीपासून ते उत्पादनापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर काम केले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही अल्पावधीत हा कारखाना यशस्वी करून दाखवला. या कारखान्यात इंजिनिअर बोराडे यांनी जी कार्यपद्धती अवलंबली, तिच्यात या यशाचं गमक सामावलं आहे. त्यांनी आपल्या वागण्या, जगण्यातूनच कारखाना यशस्वीपणे कसा चालवायचा हे दाखवून दिलं.

शरद पवार यांनी प्राचार्यपद दिल

पुढे बोराडे सरांनी नावारुपाला आणलेली जेएनईसी पाहून शरद पवार यांनी त्यांना आग्रहाने बारामती इंजिनिअरींग कॉलेजचं प्राचार्यपद दिलं. अल्पावधीतच ते कॉलेजही त्यांनी नावारुपाला आणलं. बोराडे सरांनी आयुष्यात विविध भूमिका बजावताना मिळवलेलं प्रचंड यश पाहिलं तर प्रत्येकाला यातून प्रेरणा मिळेल.राष्ट्र सेवादलाच्या विचारातून घडल्यामुळे असो की, आईवडीलाचे संस्कार असोत, त्यांनी तत्वनिष्ठेला सर्वाधिक महत्त्व दिल आहे. भ्रष्ट मार्गाचा वापर करायचा नाही. कुणाला लाच द्यायची नाही, घ्यायची नाही. लाच मागणाऱ्यांबरोबर व्यवहार करायचा नाही, ही त्यांची जीवननिष्ठा अतिशय दुर्मिळ म्हणावी लागेल. 

पुरस्कार :

  • 1991  : नाफेन पुरस्कार
  • 1992 : ऍक्मे एक्सलन्स अवॉर्ड
  • 1995 : औद्योगिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल बक्षीस
  • 1997 : भारत सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार
  • 2020 : मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

पुस्तके :

  • ‘मी न माझा’ आत्मकथन
  • पालक प्राचार्य (गौरवांक )

कारकीर्द :

  • 19983 ते 2003 असे एकवीस वर्ष जेएनईसी महाविद्यालयाचे प्राचार्य
  • 1 नोव्हेंबर 2003 रोजी विद्या प्रतिष्ठान बारामती येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य
  • 1981 साली महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज संस्थेवर संचालक म्हणून नेमणूक
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे 15 वर्ष कोषाध्यक्ष
  • मराठवाडा विकास महामंडळ संचालक

कारकिर्दीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय :

  1. जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यलयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी गणवेश सुरू केला.
  2. सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय स्तरावरील अनेक परिषदा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानांचे आयोजन.
  3. जेएनईसी महाविद्यालयात संगणक वापर आणि अभ्यासक्रम सुरूवात
  4. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण मिळावे म्हणून जेएनईसी महाविद्यालयात सुरुवातीचे 7 ते 8 वर्षे शैक्षणिक शुल्क न घेण्याचा निर्णय.

शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत,महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त,विद्या प्रतिष्ठान,बारामतीचे माजी प्रशासकीय अधिकारी, ऋषीतुल्य विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आज दुःखद निधन झाल्याची बातमी समजली.

मागील पाच दशके प्रतापरावांचा आणि माझा स्नेह होता.जगभरात एखादा देश क्वचितच आढळेल जिथे त्यांचा विद्यार्थी सापडणार नाही.आपल्या ज्ञानदानाने व उत्तम प्रशासकीय कौशल्याने त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था नावारूपास आणल्या.राज्यातील अनेक परिवर्तनवादी संघटना व संस्था यांच्यासोबत त्यांचा संवाद होता.मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते आग्रही होते.आज त्यांच्या निधनाची बातमी ही मला वैयक्तिक वेदनादायी आहे.त्यांच्या कुटुबियांना व एमजीएम परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.

प्रतापरावांच्या स्मृतींना भावपूर्ण वंदन !