माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका ; तातडीने रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली,२४ जुलै / प्रतिनिधी:-कन्नड-सोयगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार हर्षवधन जाधव यांना हृदयविकाराचा सोम्य झटका आला आहे. केंद्रीय मंत्री निती गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले असता जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृतीस्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला होता.

मनसेचे सुरुवातील निवडून आलेल्या १३ आमदारांमध्ये हर्षवर्धन जाधव यांचा समावेश होता. त्यांनतर त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवत कन्नड मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. यानंतर शिवसेनेवर आरोप करत रायभान जाधव यांच्या नावाने पत्र काढत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी मोठ आवाहन उभ केलं होतं. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मोठ मताधिक्य मिळालं होते. तसंच त्यांच्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना देखील पराभवाला सामोरे जाव लागलं होतं.