आता विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच: पद एक दावेदार अनेक!

मुंबई: विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसकडे गेल्याचे निश्चित झाल्यावर विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसमधील कोणत्या नेत्याला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार नावांची जोरदार चर्चा आहे. सुनील केदार, विजय वड्डेटीवर, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची सध्या काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष राहणार आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेस गटनेते राहणार त्यात बदल नाही, अशी माहिती मिळाली आहे. तसेच, उद्यापासून राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी विरोधीपक्षनेतेपद भरले जाणार आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल.

दरम्यान, विरोधी पक्षांनी आज सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. या पावसाळी अधिवेशनात सरकारला कोणत्या मुद्दयांवर लक्ष्य केले जाणार आहे यावर पत्रकार परिषदेत भाष्य करण्यात आले.

अजित पवार यांच्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे आमदार कमी झाल्याने काँग्रेसने हा दावा केला आहे.उद्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतं आहे. त्यामुळे काँग्रेस उद्या विरोधी पक्षेनेत्याचं नाव जाहीर करणार आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार या चार नावांची विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चा आहे. उद्या यापैकी एका नावावर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होणार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या जागा कमी झाल्या आहेत. यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीने देखील हा दावा मान्य केला आहे.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले ?

विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात आम्ही दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहोत. उद्याच्या अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही बोलणार आहोत. राष्ट्रवादीशिवाय पत्रकार परिषद झाली असे म्हणता येणार नाही, एकनाथ खडसे सहभागी होते. राष्ट्रवादीतल्या भेटीगाठी आम्हीही पाहिल्या, प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया ही पाहिली पण मी त्यावर जास्त काही भाष्य करणार नाही, त्यांच्या पक्षातील लोकांनी यावर बोलावं. महिला अत्याचार, शेतकरी अडचण, दंगली आणि अनेक प्रश्न आहेत जे अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत. हायकमांड विरोधी पक्षनेत्यावर निर्णय घेतला जाईल, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.