मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणारे चंद्रकांत कटारे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

‘गाव तेथे शाखा’ स्थापण्याचा संकल्प 

वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करुन मराठवाड्यात शिवसेनेची मुहुर्तमेढ रोवणारे शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत कटारे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मुंबई येथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जय़त पाटील, खासदार सुप्रिया सुळे या मान्यवरांच्या उपस्थितीत कटारे यांनी पक्षात प्रवेश केला.

येत्या काळात वैजापूर तालुक्यात सर्व जुन्या व नविन पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ध्येय धोरण व विचार सर्वांपर्यंत पोहचवणार असल्याचे कटारे यांनी सांगितले. पक्षाचे तालुकाध्यक्षॲड. प्रताप निंबाळकर, जे.के. जाधव यांना सोबत घेऊन गाव तेथे शाखा हा उपक्रम हाती घेण्यात येईल. पक्षात संपुर्ण तालुक्यात पुन्हा नव्याने विस्तार करुन सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यात राष्ट्रवादी कॉग्रेस कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिली. येत्या पंधरा दिवसांत मराठवाड्याच्या प्रवेशद्वार असलेल्या वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचा मेळावा जयंत पाटील व राजेश टोपे यांच्या उपस्थितीत घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.