फडणवीस वि.उद्धव :उद्धवजी कलंकीचा कावीळ झाला असेल तर…. देवेंद्र फडणवीस यांनी दिले जशास तसे उत्तर!

नागपूर: विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे’, असं म्हणाले. आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कलंकीचा कावीळ’ अशा शिर्षकाखाली फडणवीस यांनी भलं मोठं ट्विट करत उत्तर दिलं आहे.

फडणवीसांनी आठ मुद्द्यांमध्ये कलंक कशाला म्हणतात याचे ट्विट करून सविस्तर प्रत्यूत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भलेमोठे ट्विट करत उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा कावीळ’ झाला असेल तर उपचार करून घ्या असा सल्ला दिला आहे. स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा कावीळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या, असे फडणवीस म्हणाले आहेत.

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!

उद्धव ठाकरेंचा भाजपवर अमरावतीतून घणाघात

अमरावती :-ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या काल पासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल यवतमाळ जिल्ह्यात ‘पोहरा देवी’ चं दर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर त्यांनी दिग्रस येथे सभा घेत भाजपवर चांगलाचा घणाघात केला. 

image.png

आज उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावती येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना दिलेल्या मंत्रीपदावरुन चांगलेच धारेवर धरले. ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच लोकांना सरकारमध्ये घेऊन मंत्रीपद दिल्यावरुन त्यांनी भाजपची चांगलीच खरडपट्टी काढली.

image.png

अमरावतील येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने या लोकांवर केलेल आरोप खोटे होते किंवा केवळ आणि केवळ तुमच्या पक्षात आले आणि गोमूत्र शिंपडून स्वच्छ झाले. ते सांगा, असा सवाल यावेळी भाजपला केला. तसेच त्यांनी पक्षात घेतलेल्या लोकांवर गोमूत्र शिंपडताय का? असं म्हणत का चौकश्या थांबल्या त्यांच्या? असा प्रश्न देखील उपस्थित केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनात पक्षात येण्यासाठी हजारो कोटींच्या घोटाळ्याचे निकष असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “भाजपमध्ये लहान घोटाळा चालणार नाही, हजारेक कोटींचा घोटाळा असेल तर ये तुला मोठं पद देतो.” असं असल्याचं सांगितलं.

तसंच त्यांनी अमरावतीतील सभेत बोलताना ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप लावले, आज त्यांच्याच फोटोखाली फोटो लावताय, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी त्यांनी दिग्रस येथील सभेत भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजपा हा बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर यांनी मेहनकर करुन हा पक्ष वाढवला. पण आता बाजार बुणगे येत असून भ्रष्टाराचाने माखलेल्यांना भाजपात घेतलं जात आहे. अशी टीका उद्दव ठाकरे यांनी भाजपवर केली.

यावेळी त्यांनी राजकारणात फोडाफोडी होत असते. भुजबळ आपल्यात होते, नंतर ते राष्ट्रवादीत गेले. आता तिकडे गेले. पण पक्ष संपवून टाकण्याची वृत्ती आली असून ही वृत्ती संपवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी सध्या मत कोणालाही द्या सरकार आमचचं येणार असं चाललं आहे. असं म्हणत पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला याचचं. आता खोक्यातून जन्माला येतं, अशी टीका केली.

आपल्याकडचे  ४०आमदार भाजपाकडे गेले, त्यात अपक्षांचा देखील समावेश आहे. १६० की १६५ जणांचं मजबूत आहे. तर, पुन्हा राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती? असा सवाल देखील केला. तसंच अमित शाहांबरोबर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं ठरलं होतं. असं देखील ठाकरे म्हणाले.


5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!