जांबरगाव टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना पगार नाही ; समृध्दी महामार्गावर वाहतूक अडवली

वैजापूर ,१० जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर शहराबाहेरून जाणाऱ्या नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर असलेल्या जांबरगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी टोलनाक्याजवळ वाहने अडवून रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको मागे घेतला.