लोकविकास प्रतिष्ठाणतर्फे जवानांच्या आई-वडिलांचा शुक्रवारी सत्कार भाजपचे एकनाथ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळा

वैजापूर ,​६​ जुलै / प्रतिनिधी :-भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या व सध्या कार्यरत असलेल्या जवानांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडे दहा वाजता कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

लोकविकास प्रतिष्ठान, वैजापूरतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन सोहळ्यामध्ये गोदाधाम म्हणजे सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते जवानांच्या आईवडीला़ंचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी  एकनाथ जाधव यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व शहरातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात वैजापूर तालुक्यातील जवळपास २५० दांपत्यांना आमंत्रित करण्यात आले असुन त्यांचा महाराजांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकविकास प्रतिष्ठानने केले आहे.