शरद पवार यांनी घेतलेले निर्णय लागू होतील का?

प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना केली विनंती 

मुंबई :-अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३० आमदारांना सोबत घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामुळे पक्षात उभी उभी फुट पडली. राष्ट्रवादीतून बंड केलेल्या अजित पवार यांच्या गटाने पक्षाच्या चिन्ह आणि नावावर दावा केला आहे. आज अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा हा दावा केला. दुसरीकडे शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.

अजित पवार यांच्या गटाने राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले आहेत. सुनिल तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पदी तर रुपाली चाकणकर यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सुरज चव्हाण यांची युवक प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या गटाने घेतलेल्या पत्राकार परिषदेत शरद पवार यांनी घेतलेले निर्णय लागू होतील का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर प्रफुल्ल पटेल यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

शरद पवार यांनी घेतलेले निर्णय लागू होणार नाहीत, पक्षाच्या बहुसंख्य लोकांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. लोकशाहीत बहुमताने घेतलेले निर्णय अवैध आहेत किंवा त्याला कोणी बदलू शकत नाही. असंही ते म्हणाले. पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे कधी वाद होतो. असा वाद होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

यावेली प्रफुल्ल पटेल यांनी ,आमच्याकडे आमदार असल्याशिवाय अजित पवार यांनी काल शपथ घेतली असती का? असा सवाल करत आम्ही पक्ष आहोत म्हणून आम्ही संख्या सांगत नाही आहोत. जे लोग दावा करताय त्यांनी सांगाव त्यांच्याकडे किती संख्या आहे. बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी शरद पवारांना आमची हात जोडून विनंती आहे की, पक्षाचे बहुसंख्य आमदार, दिग्गज नेते, खासदार, पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या इच्छांना आदर करावा. जे चित्र सध्या दिसत आहेत. ते आता समाप्त झालं आहे. त्यांचा आशिर्वाद आमच्यासह संपूर्ण पक्षावर असेल, असं म्हटलं आहे.