आषाढी एकादशीनिमित्त वैजापूर शहरातील एकटा विठोबा मंदिरात दर्शनासाठी गर्दी

आ.रमेश बोरणारे व भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांनी सपत्नीक घेतले विठुरायाचे दर्शन

वैजापूर ,२९ जून/ प्रतिनिधी :-आषाढी एकादशीनिमित्त वैजापूर शहरातील एकटा विठोबा मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच रांग लागली होती. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मुर्तीला आकर्षकरित्या सजवण्यात आले होते. त्यामुळे विठ्ठलाचे हे लोभसवाणे रुप बघण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांग लावली होती.

सकाळी सात वाजल्याच्या सुमारास आमदार रमेश बोरनारे यांनी सपत्नीक मंदिराला भेट देत विठुरायाचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिर विस्तारीकरण व सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी या कामासाठी आणखी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक स्वप्निल जेजुरकर यांनी आमदार रमेश बोरनारे व संगिता बोरनारे या दांपत्याचा सत्कार केला. यावेळी विष्णू जेजुरकर, रवींद्र जेजुरकर, कैलास साखरे, कुमोद जेजुरकर, गोकुळ जगताप, अशोक बोर्डे, कचरू राजपूत, आनंद शर्मा, राजू साकला, प्रसाद जोशी, शांतीलाल संचेती, अजय जगताप उपस्थित होते. यावेळी मुंजोबा मित्र मंडळातर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.