छत्रपती संभाजीनगर जिल्हा वकील संघाच्या विविध पदांसाठी आज निवडणूक

छत्रपती संभाजीनगर,२२ जून / प्रतिनिधी :- जिल्हा वकील संघाच्या विविध पदांसाठी आज शुक्रवारी दि.२३ निवडणूक होणार आहे. अध्यक्षासह विविध पदांसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान मतदान होणार तर साडेतीन वाजता मतमोजणी होणार असून मुख्‍य निवडणूक अधिकारी म्हणुन अॅड. व्ही.एन. बाफना हे काम पाहणार असल्‍याची माहिती जिल्हा वकील संघाने दिली.

जिल्हा वकील संघाच्‍या निवडणुकीसाठीचे मतदान आज दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयातील तळ मजल्यावरील वकील संघाच्‍या हॉल क्रमांक एक व दोन येथे होणार आहे. या निवडणूकीत २ हजार ८०५ वकील सभासद मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. अध्यक्ष पदासाठी दोन, उपाध्‍यक्षासाठी एक महिला व तीन पुरुष, सचिव पदासाठी तीन, सह सचिव पदासाठी दोन तर सदस्‍य म्हणुन १८ उमेदवार रिंगणार उतरले आहेत. विशेष म्हणजे यावेळी वकील संघाच्‍या निवडणुकीत मुख्‍य निवडणुक अधिकारी यांनी मतदान सेल्फी पॉईंट, उमेदवार व मतदार यांच्‍यासाठी विशेष सहाय्यता कक्ष ही संक्लपना राबविली आहे.

हे आहेत उमेदवार

अध्यक्ष पदाचे उमेदवार

अॅड. मुंडवाडकर सतीश व्ही आणि अॅड. पटेल शेख मन्नुलाल शेख चंदु

सचिव पदाचे उमेदवार

अॅड. कांबळे प्रविण नारायण, अॅड. नावंदर सचिन हनुमानदास, आणि अॅड. सोनुने सदानंत किसन तर उपाध्यक्ष महिला फक्त अॅड. मगरे अनुराधा प्रल्हाद यांचा अर्ज प्राप्त झाला.

६१ अधिकारी पाहणार निवडणुकीचे कामकाज

मुख्य निवडणुक अधिकारी अॅड. व्ही. एन. बाफना, सहाय्यक निवडणुक अधिकारी अॅड. टी.एस. जोशी, अॅड. प्रशांत निकम, अॅड. नितीन कांबळे, अॅड. केदार बर्दापुरकर, अॅड. स्वप्नील पटेल व इतर ६१ निवडणुक अधिकारी मुख्य निवडणुक निवडणुक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करीत आहेत.