देवगिरी बँकेने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बांधला दुसरा सिमेंट बंधारा

छत्रपती संभाजीनगर,२२ जून / प्रतिनिधी :- देवगिरी नागरी सहकारी बँकेचे  अध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुसऱ्या बंधाऱ्याचे खोलीकरण व काँक्रीटीकरण सोहळा आमदार  श्री हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते  झाला.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. प्रमोद येवले यांनी अध्यक्षपद भूषविले. जलतज्ञ सर्जेराव वाघ, प्र कुलगुरुडॉ. श्याम शिरसाठ,कुलसचिव डॉ. भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य व सिनेट सदस्य उपस्थित होते.


या प्रसंगी बोलताना श्री हरिभाऊ बागडे (नाना) यांनी देवगिरी बँकेशी बँकेच्या स्थापनेपासून असलेला  जिव्हाळा अधोरेखित केला आणि बँकेच्या प्रगती बद्दल कौतुक केले.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी बँकेच्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. तसेच फेरोसिमेंट बंधारा आणि त्याचे फायदे तसेच उपयोग यांची माहिती दिली.


मनाली कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण नांदेडकर  यांनी आभार मानले.कार्यक्रमास देवगिरी बँकेचे संचालक जयंत अभ्यंकर , संदीप पंडित,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी  रुपेंद्र कोयाळकर व कर्मचारी तसेच विद्यापीठातील मान्यवर  उपस्थित होते.

जलदुत किशोर शितोळे यांनी बंधाऱ्याची माहिती सांगितली. 

बंधाऱ्याची माहिती :

६० फूट रुंद 

फेरोसिमेंट पद्धतीचा बंधारा 

केवळ ८ दिवसांत बंधारा बांधला . 

२० लाख लिटर पाणी अडणार, 

१ कोटी लिटर पाणी जमिनीत जिरणार