वैजापूर तालुका भाजपतर्फे मोदी@9 महाजनसंपर्क अभियानअंतर्गत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक व व्यापाऱ्यांशी संवाद 

वैजापूर ,१४ जून/ प्रतिनिधी :-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 30 मे 2023 ते 30 जून 2023 दरम्यान भारतीय जनता पक्षातर्फे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वैजापूर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवारी (ता.16) येथे पक्ष कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली असून व्यापारी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात येणार आहे. या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी दिली.

या संदर्भात माहिती देतांना डॉ. दिनेश परदेशी यांनी सांगितले की, प्रदेश भाजपकडून मिळालेल्या निर्देशानुसार वैजापूर विधानसभा संयुक्त मोर्चा व सर्व आघाडी प्रमुख यांची 16 जून 2023 रोजी सकाळी अकरा वाजता लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता शहर व ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून त्यांच्याशी प्रत्यक्ष सवांद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बैठकीस तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. दिनेश परदेशी यांनी केले आहे.