वैजापूर येथील जैन सोशल ग्रुप व पाठशाळेच्यावतीने आदिवासी कुटुंबाना दिवाळी फराळाचे पॅकेज वाटप

वैजापूर ,४ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- दिवाळी सणानिमित्त वैजापूर येथील जैन सोशल ग्रुप व जैन पाठशाळेच्यावतीने शहरातील विविध भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या कुटुंबाना दिवाळी फराळाचे पॅकेज वाटप करण्यात आले. 

Displaying IMG-20211104-WA0066.jpg

शहरातील देवी मंदिर व स्वस्तिक टॉकीज परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजबांधवांना सामाजिक कार्यकर्ते प्रकाशसेठ बोथरा, धोंडिरामसिंह राजपूत, निलेश पारख व प्रफुल्ल संचेती यांच्याहस्ते फराळाचे साहित्य व लहान मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

आदिवासी समाजबांधवांनी दिवाळी गोड व्हावी यासाठी जैन पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता त्यापैशातून दिवाळीचा फराळ गोरगरीब आदिवासी समाजबांधवांना वाटप केला.याकामी वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती यांचे सहकार्य त्यांना लाभले.जैन पाठशाळेचे राजू संचेती व धोंडिरामसिंह राजपूत यांनी आदिवासी समाजातील नागरिकांना कोरोनाबाबत माहिती देऊन जनजागृती केली. जैन सोशल ग्रुपचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.