अनुदानित सोयाबीन बियाणे वाटपातून वैजापूर तालुक्याला वगळले ; मंत्र्यांच्या तालुक्यांना मात्र अनुदान

वैजापूर ,​७​ जून/ प्रतिनिधी :- तेलबिया उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन बियाणे Answer जाते. मात्र या वर्षी हे अनुदानीत बियाणे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील केवळ सिल्लोड, पैठण व संभाजीनगर या तीनच तालुक्याची निवड करण्यात आली आहे. वैजापूरसह अन्य तालुक्यांना वगळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर दिसून येत आहे.

राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी कृषी विभागाच्या वतीने विशेष कृती योजना राबविण्यात येते.तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी ही योजना राबविण्यात येते.२०२३ -२०२४ या वर्षासाठी संभाजीनगर जिल्ह्याला ११५५ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.या सोयाबीन बियाण्यास शासन २४७५ रूपये क्विंटल अनुदान देते.

परंतु जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड व संभाजीनगर या तीनच तालुक्याची अनुदान वाटपासाठी निवड झाली असून अन्य तालुक्यांना वगळण्यात आल्याचे उघड झाले आहे.या तिन  तालुक्यासाठी प्रत्येकी ३८५ क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.हे तिन्ही तालुके मंत्र्यांचे असून मंत्र्यानी स्वतःच्या तालुक्यातच अनुदानाचे बियाणे वाटुन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.