वैजापूर शहरात आपला दवाखाना सुरू ; आ. बोरणारे यांच्या हस्ते उदघाटन

वैजापूर ,१३ मे  / प्रतिनिधी :-वैजापूर येथे शनिवारी ‘ हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरु करण्यात आला. आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून व धन्वंतरीचे पुजन करुन दवाखान्याचे उदघाटन केले.

राज्य सरकारच्या सार्वजनिक विभागांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला असून शहरात अशा प्रकारचे आणखी दोन दवाखाने सुरु करण्यात आले आहे. त्या माध्यमातून गोरगरीबांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. राज्यातील शिंदे-फडणविस सरकारच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीतुन साठ कोटी रुपयांचे रुग्णांना वाटप झाले असल्याचे सांगत हे सरकार आरोग्य सेवेचे उत्कृष्ट कार्य करत आहे असे प्रतिपादन यावेळी आ  रमेश बोरणारे यांनी केले. 

या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष साबेरखान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदुरकर, बाबासाहेब जगताप, राजेंद्र साळुंके, पारस घाटे, दिनेश राजपूत, गटविकास अधिकारी एच.आर.‌बोयनर, सुलभा भोपळे, डॉ. अंजली राहणे, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत, बाजार समितीचे संचालक काकासाहेब पाटील, गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, नगरसेवक गणेश खैरे, स्वप्निल जेजुरकर, इम्रान कुरेशी आदींची उपस्थिती होती.