महाराष्ट्र बँकेचे खाजगीकरण म्हणजे  भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचे  षडयंत्र

​औरंगाबाद ,दि. १३​ बँक ऑफ महाराष्ट्र एम्पलॉइज असोसिएशन औरंगाबाद तसेच बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर असोसिएशन औरंगाबाद यांच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून दि 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर हा स्थापना दिवस सप्ताह साजरा करण्यात येणार आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरण विरोधी जन अभियानाची सुरुवात शपथ ग्रहण ​​ कार्यक्र​​माने केली आहे

बँक ऑफ महाराष्ट्र’च्या विभागीय कार्यालयातील पटांगणात शपथ ग्रहण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात  प्रमुख पाहुणे  प्रल्हाद अंभोरे  जनरल मॅनेजर( निवृत्त) बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सर्व कर्मचारी व अधिकारी यांना शपथ दिली तसेच बँक ऑफ महाराष्ट्र  ऑल इंडिया फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर उपस्थित होते या वेळी बोलताना  अंभोरे ​यांनी ​बँक ऑफ महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रगतीचा उल्लेख केला. तसेच महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र चा उल्लेखनीय वाटा असल्याचे नमूद केले. कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्रची परिस्थिती सदृढ असून व मार्च 2020 मध्ये 389 कोटी नफा असूनही बँकेचे खाजगीकरण म्हणजे  भांडवलदारांच्या ताब्यात बँक देण्याचे  षडयंत्र असल्याचे नमूद केले व कोणत्याही परिस्थितीत हे खाजगीकरण होऊ दिले जाणार नाही व बँक ऑफ महाराष्ट्र ही सामान्य लोकांची   बँक राहणार आहे व त्यासाठी व्यापक जन आंदोलनाची सुरुवात आता होत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाला कर्मचारी व अधिकारी तसेच महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अधिकारी असोसिएशनचे झोनल सेक्रेटरी धनंजय निलेवाड यांनी केले सूत्रसंचालन आणि प्रस्तावना कॉ राजेंद्र  देवळे यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उत्तम भाकरे , अजय केंद्रे, सुरेश सेवेकर, विलास बावस्कर ,मनिंदर कानसा,  पियुष बिऱ्हाडे वृंदा कुलकर्णी यांनी प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *