थोर समाज सुधारक व वीर पुरुषांना जातीपातीच्या पिंजऱ्यात बंदिस्त करू नका – अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार

वैजापूर ,१७ एप्रिल  / प्रतिनिधी :- देशातील थोर समाज सुधारकाना व वीर पुरुषांना कोणत्याही समुदायाने जाती-पातीच्या पिंजऱ्यात न अडकवता त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी कार्यक्रमात संपूर्ण मानव जातीला सहभागी करून घ्यावे व उत्सव साजरे करावे असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्हा (ग्रामीण) चे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी रविवारी (ता.16) येथे केले. येथील वैजीनाथ जेष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान देताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, न्यायाचे राज्य म्हणजे हिंदवी राज्य होय. यांचा पाया बाल शिवाजी व राजमाता जिजाऊंनी रचला. भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलतांना ते म्हणाले की, डॉ.आंबेडकर यांनी घटनेतच स्वातंत्र्य, समता, बंधुता ही त्रिसूत्री नमूद करून देशातील सर्वांना समान लेखले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. खरा तो एकची धर्म प्रार्थना सादर करण्यात आली. वैजीनाथ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश बोथरा,उपाध्यक्ष रवींद्रआप्पा साखरे, बबन क्षीरसागर, अशोक धसे, संपत डोंगरे, सुरेश संत, मुकुंद दाभाडे, बाबासाहेब गायकवाड, भगवानसिंह राजपूत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सचिव ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यानी प्रास्ताविक व सूत्र संचलन केले. 

व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती,-माजी उपनगराध्यक्ष अकील शेख, गटविकास अधिकारी एच.आर.बोयनर, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, आधार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब शेळके, चैतन्य चे प्रा.पी.एम.शिंदे, महिला उत्कर्ष च्या अंजलीताई जोशी, जेष्ठ नागरिक झुंबरलाल शर्मा यांची उपस्थिती होती. आभार संपत डोंगरे यांनी मानले. उत्तमराव साळुंके यांनी प्रार्थना सादर केली. सुदाम गोंधळे, बबन क्षिरसागर, बाबासाहेब गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.