वीजग्राहकांना उत्कृष्ट सेवेसह महसूलवाढीला प्राधान्य द्या : मुख्य अभियंता सचिन तालेवार

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात सुरळीत वीजपुरवठा, दर्जेदार ग्राहकसेवेसह महसूलवाढ व वसुली कार्यक्षमता वाढवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या, असे निर्देश मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी सोमवारी (10‍ एप्रिल) अभियंता व अधिकाऱ्यांना दिले. मौलाना आझाद संशोधन केंद्रात आयोजित वार्षिक आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत परिमंडलातील उत्कृष्ट ग्राहकसेवा, महसूलवाढ व वसुली कार्यक्षमतेत गेल्या वर्षभरात सातत्याने सांघिकपणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडल, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयांतील अभियंता व अधिकाऱ्यांना मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मंचावर अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे (शहर मंडल), प्रवीण दरोली (ग्रामीण मंडल) व संजय सरग (जालना मंडल) यांची उपस्थिती होती.

            यावेळी मुख्य अभियंता तालेवार म्हणाले, की यंदाच्या आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील वीजहानी कमी करण्यासोबतच वीजबिलांमधून परिमंडल थकबाकीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात अचूक बिलिंग, थकीत वीजबिलांची वसुली, महसूलवाढीच्या विविध उपाययोजना, वीजचोरीविरुद्ध कठोर कारवाई आणि तत्पर ग्राहकसेवा या बाबींकडे सर्वांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

छत्रपती संभाजीनगर परिमंडल अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येक उपविभागातून एक शाखा, प्रत्येक विभागातून एक उपविभाग, प्रत्येक मंडलातून एक विभाग तसेच परिमंडलातून एका मंडलाचा प्रातिनिधीक गौरव मुख्य अभियंता तालेवार यांच्या हस्ते करण्यात आला. महेश सोनार (पॉवर हाऊस), दादासाहेब काळे (रेल्वे स्टेशन एमआयडीसी), इशान उबाळे (‍सिटी चौक), विक्रांत खाडे (बजाजनगर), राजेश गिरी (सिडको एन-9), शरद ढाकणे (विमानतळ), विनोद शेवणकर (गारखेडा), सुशील देवकर (मोंढा), सचिन उकांडे (ग्रामीण), मनीष मगर (शेंद्रा एमआयडीसी), सचिन सोमवंशी (दावरवाडी), रवींद्र कापगते (सिल्लेगाव), प्रदीप काळे (बाजारसावंगी), अमोल घोडके (वारेगाव)‍, मिथुन पवार (चापानेर), अविनाश धाकपडे (करंजखेड), नितीन कुलकर्णी (महालगाव), अभिजीत पाटील (गारज), अविनाश कुंदे (बनोटी), मनोज सोन्ने (आमठाणा), भीमराव कडेल (गोळेगाव), कृष्णा कुलकर्णी (बदनापूर), प्रमोद दारकोंडे (भोकरदन), प्रशांत गित्ते (माहोरा), ‍सचिन गुल्हाने (जालना शहर-4), प्रकाश चव्हाण (जालना ग्रामीण-3), समीर धोपेकर (अंबड), व्यंकटेश परसे (तीर्थपुरी), प्रवीण गणेर (वाटूर), विकास दरेकर (परतूर) या शाखा ‍ ‍अभियंत्यांना तसेच शंकर चिंचाणे (पॉवर हाऊस), अतुल देवकर (क्रांती चौक), प्रशांत तोडकर (ग्रामीण-1), उस्मान खान (खुलताबाद), स्वाती ढगे (‍सिल्लोड-2), सुधीरकुमार वानखेडे (जालना शहर) व नीलेश बेंडाळे (परतूर) या उपविभागीय अभियंत्यांना गौरवण्यात आले. याबरोबरच कार्यकारी अभियंता महेश पाटील (शहर-2 विभाग), विश्वनाथ लहाने ( कन्नड विभाग) व दीपक सोनोने (जालना-1 विभाग) व अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे (शहर मंडल) यांचाही उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान करण्यात आला.

            कार्यक्रमास कार्यकारी अभियंता सतीश खाकसे, प्रेमसिंग राजपूत, विष्णू ढाकणे, भूषण पहूरकर, सुरेश जाधव, सोमनाथ मठपती, जयंत खिरकर, प्रभारी वरिष्ठ व्यवस्थापक नितीन पाडसवान, व्यवस्थापक विजय पचारे, सखाराम जरारे, सुनील मगरे यांच्यासह अभियंते व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर आर्दड यांनी केले व आभार उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांनी मानले.