महात्मा फुले जयंतीनिमित्त पुस्तक वाटप

छत्रपती संभाजीनगर,११  एप्रिल / प्रतिनिधी :-  महावितरणच्या शहर विभाग-1 कार्यालयात सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची 196 वी जयंती अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

            महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सहायक लेखापाल प्रज्ञा दिवेकर यांच्यातर्फे विभाग कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, सहायक, उपकार्यकारी अभियंता मनीषा उबाळे, सहायक अभियंता सुप्रिया कुलकर्णी, अश्विनी सोनवणे, अजय जक्कल, ए. आर. पठाण, एस. एस. काकडे, एस. यू. गायकवाड,  पांडुरंग पठाडे, एस. डी. राऊत, आर. आर. कोरडे, व्ही. व्ही. जोशी, किरण पंडित, किशोर काटे, एस. आर. दुरोळे, यू.जी. खान, सचिन जंजाळ, सपना मुक्कावार, स्वाती सुरडकर, सलमा शेख, भाग्यश्री घोडके, एल.आर. पवार  आदी उपस्थित होते. उपव्यवस्थापक (मानव संसाधन) संदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. रोहन श्रीरामवार यांनी आभार मानले.