अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत वृंदिका भागवत- त्त्विशा नंदकरला उपविजेतेपद

वैजापूर ,४ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत (राजपूत) यांची कन्या वृंदिका भागवत राजपूत व तिची सहकारी त्त्विशा नंदकर यांनी अहमदाबाद येथे पार पडलेल्या चौदा वर्षीय गटातील अखिल भारतीय  मुलींच्या टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करून देश पातळीवरील उपविजेतेपद पटकाविले.

अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत मानांकन पटकावून छत्रपती संभाजीनगरचे नाव टेनिस स्पर्धेत राष्ट्र पातळीवर नेले त्याबद्दल या मुलींचे सर्वत्र कौतूक होत आहे. यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल प्रशिक्षक

रुपेश रॉय, आ.रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत, उपजिल्हाधिकारी माणिक आहेर यांनी या मुलींच्या यशाबद्दल विशेष कौतुक केले आहे.