माळीसागज येथे विविध विकास कामांचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,२५ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील माळीसागज येथे विविध विकास कामांसाठी शासनाच्या विविध योजनेतून 1 कोटी 50 लक्ष 32 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा गुरुवारी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते पार पडला.

माळीसागज ते भगुर रस्ता 57 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन, जलजीवन कामांचे 43 लक्ष 32 हजार रुपये कामांचे भूमिपूजन, गावांतर्गत पेव्हर ब्लॉक 15 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन, डरे वस्ती रस्ता खडीकरण 10 लक्ष रुपये कामांचे लोकार्पण, दर्गा परिसर सभामंडप 10 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन, गावं अंतर्गत सिमेंट रस्ता 7 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन, दलीत वस्ती पेव्हर ब्लॉक 8 लक्ष रुपये या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास युवासेना जिल्हाप्रमुख भरत कदम, बाजार समितीचे संचालक गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, उपतालुकाप्रमुख महेश बुणगे, उपविभागप्रमुख हरिभाऊ साळुंके, युवासेना तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, तालुका समन्वयक गणेश निकोले, युवासेना उपतालुकाप्रमुख नरेंद्र सरोवर, योगेश गायकवाड, सरपंच ताराबाई पवार, ऋषिकेश साळुंके, नारायण कराळे, कैलास सातपुते, जनार्दन चव्हाण, उपसरपंच योगेश गाढेकर, चेअरमन मयूर फाळके, पंकज गाढेकर, दिनकर पवार, शरद पवार, शरद गाढेकर, मच्छिंद्र रोठे, सुनील जाधव, भरत गुंड, गणेश पवार, राहुल शेळके, नवनाथ कदम, किरण कदम, नंदकुमार घोडके, रमेश पवार, याकुब शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.