राहुल गांधींना सुरत न्यायालयाचा दिलासा:१३ एप्रिलपर्यंत वाढवला जामीन

सुरत: काँग्रेसचे माजी लोकसभा खासदार राहुल गांधी यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानहानी प्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध राहुल गांधी यांनी आज याचिका दाखल केली होती.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने मोदी मानहानी प्रकरणात २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी आज स्वतः राहुल गांधी सुरत सत्र न्यायालयात जाऊन झालेल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली.आज राहुल गांधी हे बहीण प्रियंकासह आणि तमाम काँग्रेस नेते सुरतमध्ये पोहचले होते. सुरतच्या कोर्टात जी आव्हान याचिका राहुल गांधी यांनी दाखल केली होती त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.यानंतर त्यांना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. मानहाणीच्या प्रकरणात त्यांना १५ हजारच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. तसेच १३ एप्रिलपर्यंत त्यांच्या जामीनात वाढ करण्यात आली आहे. तर, या संदर्भातील पुढील सुनावणी ही ३ मेला होणार आहे.
दरम्यान, मानहानीचा प्रकरणावर १३ एप्रिलला पुढील सुनवाई होणार आहे. तर, ३ एप्रिलला त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना ३० दिवसांचा वेळ दिला होता.

‘सर्व चोरांची आडनावे मोदीच का असतात?’ या वक्तव्यावरुन त्यांना मानहानीच्या आरोपाखाली कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज त्यांनी न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध अपील दाखल केल्यानंतर ही सुनावणी झाली.२४ मार्च रोजी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे नवी दिल्लीतील निवासस्थान रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यासाठी त्यांना २२ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, जरी राहुल गांधींना जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने ही शिक्षा रद्द न केल्यास ते पुढील ८ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतील.

सुरत कोर्टातून जामीन मिळताच राहुल गांधींसह सगळ्याच काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यानंतर राहुल गांधी यांचं पहिलं ट्वीट चर्चेत आहे. माझा संघर्ष सुरू आहे आणि सत्य हेच माझं अस्त्र आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

काय आहे राहुल गांधी यांचं ट्वीट?

ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है।

इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र है, और सत्य ही मेरा आसरा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे असं वक्तव्य कायम करतात. त्यावर टोमणा मारत सध्या मित्र काळाच्या विरोधात लोकशाही वाचवण्याची ही लढाई आहे. या संघर्षात सत्य हे माझं अस्त्र आहे आणि सत्याचाच मला आधार आहे या आशयाचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम त्यांच्या मित्रांची मदत करतात असा आरोप कायमच राहुल गांधी करत असतात. त्यानंतर आता त्यांनी या आशयाचंच ट्वीटही केलं आहे.