किराडपुरा दंगलीतील आणखी १५ आरोपींना पोलिस  कोठडी 

छत्रपती संभाजीनगर,३ एप्रिल /प्रतिनिधी :- किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी १५ आरोपींच्‍या विशेष तपास पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींना ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. वानखडे यांनी सोमवारी दि.३ एप्रिल रोजी दिले.

शेख अबरार शेख महेबुब (३०, रा. रहिमनगर), शेख शफिक शेख शरीफ (३०, रा. बायजीपुरा), तालेब उस्‍मान शहा (२४, रा. कच्‍ची घाटी), शेख रिझवान शेख सत्तार (२२, रा. किराडपुरा), शहेबाज अजिज पठाण (२२, रा. बाबर कॉलनी), शेख पाशा शेख महेमुद (३१, रा. गणेश कॉलनी, रशिद पुरा), आसेफ पठाण असदउल्‍ला पठाण (२५, रा. किराडपुरा), खमरोद्दीन मोमीन शकील मोमीन (२१, रहिमनगर, अल्तमश कॉलनी), सरफराज खान बाबु खान (२३, रा. हर्सुल), जुनेद शेख जुबेर शेख (२४, रा. कटकटगेट), शेख जमीर शेख शब्बीर (४६, रा. कौसर पार्क, नारेगाव), शेख अकबर शेख पाशा (२९, रा. कैसर कॉलनी), मोहसिन खान युसूफ खान (२९, रा. शरीफ कॉलनी), मोहम्मद सोफियान अब्दुल सलाम (३१, रा. शहा बाजार, चाऊस कॉलनी) आणि सय्यद जुबेर सय्यद खालेद (४९, रा. बसैय्ये नगर, संजयनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्‍हा हा गंभीर स्‍वरुपाचा आहे. आरोपींचे आणखी कोण सा‍थीदार आहेत याबाबत आरोपींकडे चौकशी करायची आहे. गुन्‍ह्यात वापरलेले लाठ्या-काठ्या, सळ्या हस्‍तगत करायचे आहेत. त्‍याचप्रमाणे गुन्‍हा करण्‍यामागे आरोपींचा नेमका हेतु काय होता याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी यांनी न्‍यायालयाकडे केली होती.

 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

किराडपुरा येथील राम मंदिर परिसरात तुफान दगडफेक करीत दंगा करणाऱ्या आठ संशयीतांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

बरकत शौकात शेख (२३), शेख अतिक शेख हारुण (२४), सद्दामशह बिस्मिल्ला शहा (३३, सर्व रा. कटकटगेट किराडपुरा), शेख खाजा शेख रशिद (२५, रा. खासगेट), शारेख खान इरफान खान (२३, रा. राजाबाजार), शेख सलीम शेख अजीज (२५, रा. सेंदुरजण, सिंदखेड राजा जि. बुलढाणा), सय्यद नुर सय्यद युसूफ (३०, रा. गल्ली नं.६, बायजीपुरा) आणि शेख नाजीम शेख अहेमद (२४, रा. किराडपुरा) या किराडपुऱ्यातील आठ संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपली होती. त्यांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए एस वानखेडे यांच्या न्यायालयात हजर केले.

सहाय्यक सरकारी वकील समीर बेदरे यांनी युक्तीवाद केला की शहराचे नामांतर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि ऐन रामनवमीच्या मध्यरात्री नेमका राममंदिरासमोर हा दंगा झालेला आहे. अटकेतील आरोपींकडून इतरही आरोपी संशयित दंगेखोरांची नावे मिळवायची असल्याने आणखी पोलिस कोठडी आवश्यक आहे. 

याविरुद्ध आरोपीचे वकील अॅड. नवाब पटेल, अॅड. सलीम खान, अॅड. सोहेल सिद्दिकी, अॅड. खणके आणि अॅड. दीपाली राव यांनी युक्तीवाद केला की, पोलिसांकडे सीसीटीव्ही उपलब्ध असताना त्याआधारे ते संशयितांचा शोध घेऊ शकतात. त्याकरता याच आरोपींची कोठडी आवश्यक नाही. शिवाय अटकेच्या वेळी पोलि स जो युक्तीवाद करीत होते तोच आताही करताहेत. अटकेच्या व कोठडीदरम्यानच्या काळात त्यांच्या तपासात काहीच प्रगती नाही त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्यात येऊ नये. उभय युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.