पारळा येथे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची तहसीलदार राहुल गायकवाड यांच्याकडून पाहणी

वैजापूर ,१९ मार्च / प्रतिनिधी :- पारळा गावात झालेल्या गारपिटीची तहसीलदार राहुल गायकवाड, तालुका कृषी अधिकारी आव्हाड, नायब तहसीलदार प्रविण जाधव, तलाठी विकास पेहरकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एच.आर.बोयनर, पंकज ताजने, दत्ता पुंड, अमोल आव्हाड यांच्या उपस्थिती मध्ये पाहणी करण्यात आली. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून गावातील प्रत्येक शेतावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी तहसीलदार राहुल गायकवाड यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.

याप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके, तालुका उपप्रमुख गोरख आहेर, सरपंच गणेश आहेर, दिलीप जगताप, बाळू जगताप, बाळू सांगळे, रघुनाथ  देव्हारे, प्रकाश घुगे, संभाजी सुरासे, बाबासाहेब गायकवाड, भगवान वाघ, भाऊलाल सांगळे, राजू सांगळे, लहानु शेळके आदी शेतकरी उपस्थित होते. सद्या स्थितीत कोणत्याही पिकाला भाव नाही, दुसरीकडून निसर्गाची अवकृपा त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी केली आहे