वैजापूर तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९३.९१ टक्के ; यावर्षी निकालात घसरण

वैजापूर ,२५ मे  / प्रतिनिधी :- बारावीच्या परीक्षेत वैजापूर तालुक्यातील ९३.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या आलेल्या परीक्षेत तालुक्यातील ३१ केंद्रावरून सुमारे चार हजार ६२० विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमात परीक्षा दिली होती त्यापैकी चार हजार ३३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २७६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. एक हजार ८९८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा यंदाचा बारावीचा निकाल घसरला आहे. २०२२ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत तालुक्यातुन ९५.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

तालुक्यातील विविध महाविद्यालयांचे निकाल पुढीलप्रमाणे विनायकराव पाटील महाविद्यालय (९०.८३%), हल्क ए दवानाईक उर्दू कनिष्ठ महाविद्यालय (९१%), विनायक कनिष्ठ महाविद्यालय देवडोंगरी (७५%), बहिणाबाई कनिष्ठ महाविद्यालय शिऊर (९४.११%), माध्यमिक विद्यालय दहेगाव (८४.४४%), विनायकराव पाटील माध्यमिक विद्यालय, लोणी खुर्द (८९.६५%), विवेकानंद माध्यमिक विद्यालय गारज (९७.०१%), दादासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय विरगाव (९७.५६%), भागीरथी माध्यमिक विद्यालय नालेगाव (९८.०९%), माध्यमिक विद्यालय लाडगाव (८३.३३%), संत जोसेफ माध्यमिक विद्यालय माळीघोगरगाव (७३.३३%), श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय, वाकला (९७.०५%), जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय, मनुर (९३.१२%), श्री पारेश्वर विद्यालय, पालखेड (१००%), राजे संभाजी माध्यमिक विद्यालय, आघूर (९७.९०%), भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, भटाणा (९६.९८%), श्रीराम माध्यमिक विद्यालय, लाखणी (८६.८८%), छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय, वैजापूर (८८.९६%), मनुबाई माध्यमिक विद्यालय, मनेगाव (९५.८१%), कुलभुषण कनिष्ठ महाविद्यालय, खंडाळा (९७.५०%), श्री समर्थ माध्यमिक विद्यालय लाख खंडाळा (९७.९७%), न्यू हायस्कूल धोंदलगाव (८४.८७%), रामेश्वर विद्यालय बिलोणी, (९०.६२%), न्यु हायस्कूल, महालगाव (९२.८५%), कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय, परसोडा (९२%), राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय लासुरगाव (९६%), दादासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालय (१००%), संजीवनी कनिष्ठ महाविद्यालय (१००%), छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (९१.७२%), गॅलेक्सी कनिष्ठ महाविद्यालय, लोणी (९८.१८%), द्वारकानाथ इंग्लिश स्कूल (१००%).

यंदाही मुलींची बाजी 

यंदाच्या बारावीच्या परीक्षेतही नियमित मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुलींच अव्वल ठरल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, यावर्षी वैजापूर तालुक्यातुन दोन हजार ७८८ मुलांनी परिक्षा दिली. त्यापैकी दोन हजार ५८२ म्हणजे ९२.६१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एक हजार ८६९ मुलींनी बोर्डाची परीक्षा दिली होती.‌ त्यापैकी एक हजार ७९२ म्हणजे तब्बल ९५.८८ टक्के मुलींनी घवघवीत यश मिळवले आहे.