नव्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर देशभरातील १९ पक्षांचा बहिष्कार

नवी दिल्ली,२४ मे / प्रतिनिधी :-  केंद्र सरकारकडून येत्या २८ मे रोजी नव्या संसदेचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यावर देशभरातील १९ विरोधीपक्षांनी बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमातून राष्ट्रपतींना बेदखल करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. असे म्हणत विरोधी पक्षांकडून एकत्रितपणे निषेधपत्र जारी करण्यात आले आहे. या बहिष्कारात महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील समावेश आहे.

उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांचे मत

नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर देशभऱातील १९ पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. ज्या हुकुमशाही पद्धतीने नव्या संसदेची निर्मिती केली जात आहे त्याकडे दुर्लक्ष करुन नवीन संसदेच्या उद्घाटनाला यायला आवडले असते. मात्र, ज्या पद्धतीने या कार्यक्रमातून राष्ट्रपतींना बेदखल केले जात आहे तो लोकशाहीचा अपमान आहे. घटनेनुसार लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन्ही सभागृह आणि राष्ट्रपती यांची मिळून संसद बनते. राष्ट्रपतींच्या सहीने कायदा पास होत असतो. महिला आदिवासी राष्ट्रपती बनवण्याची सर्वसमावेशक प्रक्रिया ज्या लोकशाहीने घडवून आणली त्याचाही अनादर होत आहे, असे मत नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधी पक्षांनी व्यक्त केले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे की त्या या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. त्यांनी सांगितले की या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते झाले पाहिजे. आम आदमी पक्षानेही बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींनीच संसद भवनाचे उद्घाटन करावे असे म्हटले होते. त्यानंतर आता अशी माहिती मिळत आहे की काँग्रेसनेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नव्या संसद भवनाची गरज होती का, देशाच्या राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी का डावलण्यात आले. एका आदिवासी महिलेला डावलल्याबद्दल संसद भवनाचा जो २८ तारखेला कार्यक्रम आहे. त्यावर काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षांनी निर्णय घेतला आहे की आम्ही त्या सोहळ्यावर बहिष्कार टाकू. तसेच राष्ट्रपतींना का डावलले याचे उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींनीच संसद भवनाचे उद्घाटन करावे असे म्हटले होते. त्यानंतर आता अशी माहिती मिळत आहे की काँग्रेसनेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नव्या संसद भवनाची गरज होती का, देशाच्या राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी का डावलण्यात आले. एका आदिवासी महिलेला डावलल्याबद्दल संसद भवनाचा जो २८ तारखेला कार्यक्रम आहे. त्यावर काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षांनी निर्णय घेतला आहे की आम्ही त्या सोहळ्यावर बहिष्कार टाकू. तसेच राष्ट्रपतींना का डावलले याचे उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी केला आहे.

एकीकडे या उद्घाटनावर १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. दुसरीकडे सरकार मात्र या कार्यक्रमाची दोरदार तयारी करताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भातील माहिती दिली. या नवीन संदसते दक्षिणेतील चोल साम्राज्याचा राजदंड स्थापित केला जाणार आहे. नव्या संसदेत अध्यक्षांच्या खुर्चीजवळ हा राजदंड ठेवला जाणार आहे. सत्ता हस्तांतर करण्यासाठी हा राज दिला जात होता अशी प्रथा आहे. भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिला होता, अशी माहिती शाह यांनी दिली आहे.

संसद भवन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. येथे अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

२८ तारखेचा ‘योगायोग’ की ‘मास्टरस्ट्रोक’

तसे पाहिले तर भाजप हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना नेहमीच एका नायकाच्या रुपात मानत आला आहे. भाजप राष्ट्रवादासह हिंदुत्वाला सोबत घेत राजकारणात आपली पकड घट्ट करत आहे. अशा वेळी सावरकर भाजपला जास्त फायदेशीर ठरतात. भाजपाच्या काही नेत्यांनी तर सावरकरांना भारतरत्न देण्याचीही मागणी केली आहे. सावरकरांच्या जयंती दिनीच संसद भवनाचे उद्घाटन करून भाजप सावरकरांना पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. या रणनितीवर राहुल गांधी आणि काँग्रेसने सणसणीत उत्तर दिले पाहिजे, अशीही राजकीय वर्तूळात चर्चा सुरु आहे.

१९ पक्षांचा बहिष्कार

संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोध वाढत चालला आहे. आतापर्यंत १९ राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. या पक्षांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जनता दल (युनायटेड), राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना (उबाठा), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), समाजवादी पार्टी, राजद, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, इंडियन युनियन मुस्लीम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फ्रेन्स, केरळ काँग्रेस (मणि), रिवोल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी, विदुथलाई चिरुथिगल, कच्ची, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कडगम, राष्ट्रीय लोकदल या पक्षांचा समावेश आहे.