अकोलीवाडगाव येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर ,१९ मार्च / प्रतिनिधी :-वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघासाठी पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन योजनेसाठी मंजूर झालेल्या एकूण निधीपैकी 26 लक्ष रुपये निधीच्या अकोली वाडगांव येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन रविवारी (ता.19) श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती महंत श्री.रामगिरीजी महाराज यांच्याहस्ते करण्यात आले.आ.रमेश पाटील बोरणारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या भूमीपूजन कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हासमन्वयक बाळासाहेब चव्हाण, तालुकाप्रमुख अनिल चव्हाण, शहरप्रमुख पारस घाटे, माजी उपसभापती महेंद्र पाटील गंडे, ह.भ.प.रामभाऊ महाराज, मधुकर महाराज, उपतालुकाप्रमुख नानासाहेब धोत्रे, रामुकाका धोत्रे, युवासेना तालुकाप्रमुख सतीश हिवाळे, उपविभागप्रमुख विजय काकडे, भावराव पवार, महेश मनाळ, ऋषीकेश मनाळ, दत्तु पाटील खपके, चंदन बेडवाल, जालमसिंग महेर, अक्षय राजपूत, ईश्वर जानराव, नंदु ढगे, दिपक धोत्रे, गोरख राऊत, सचिन नवले, रोहिदास जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.