समृद्धी महामार्गावर कारचा अपघात:छत्रपती संभाजीनगरमधील ६ जण मृत; ७ गंभीर जखमी

बुलढाणा : नागपूर ते शिर्डी समृद्धी या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यूमुखी पडले तर ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही कार छत्रपती संभाजीनगर वरून शेगावला जात होती. त्या प्रवासादरम्यान कार उलटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. यात अर्टिका गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे.बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-11 मधील रहिवाशी आहेत. 

हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान घडला. भरधाव वेगातील इर्टिगा गाडी ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये घुसली व तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांमध्ये एका लहान मुलासह चार महिलांचा आणि ड्राइवरचा समावेश आहे. हा अपघात सकाळी ७ वाजता झाला. या अपघातानंतर जवळपास पाऊण तास कोणतीही मदत त्यांना मिळू शकली नाही. हा महामार्ग नवीन असल्यामुळे तेथे अद्याप जवळपास कुठली मदतकेंद्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे.हा महामार्ग ऍक्सेस कंट्रोल असल्यामुळे या महामार्गावर गाड्या प्रचंड वेगाने सुसाट सुटतात आणि त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटते आणि भीषण अपघात होतात.

पाऊण तास मदत नाही

धक्कादायक बाब म्हणजे अपघात झाल्यावर पाऊण तास अपघातग्रस्तांना मदत मिळाली नाही, अशी स्थानिक व प्रत्यक्षदर्शिंनी याबाबत माहिती दिली असून यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसत आहे. मेहकर टोल प्लाझा येथून फक्त 10 किलोमीटर वर झालेल्या अपघातातील जखमींना तत्काळ मदत न मिळाल्याने अवस्था गंभीर झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी व स्थानिक मदतकार्य करणारे व्यक्ती सरपंच समाधान पिसे संदीप पिसे खुशालराव वाघ यांनी दिली आहे.

या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू

 • हौसाबाई भरत बर्वे (वय 60)
 • श्रद्धा सुरेश बर्वे (वय 28)
 • किरण राजेन्द्र बोरुडे (वय 35)
 • भाग्यश्री किरन बोरुडे (वय 28)
 • प्रमिला राजेन्द्र बोरुडे (वय 58 )
 • जानवी सुरेश बरवे (वय 12 वर्ष)

जखमींवर उपचार सुरू

 • नम्रता रविन्द्र बर्वे (वय 32)
 • रुद्र रविन्द्र बर्वे (वय 12)
 • यश रविंद्र बर्वे वय 10 वर्षे
 • सौम्या रविंद्र बर्वे (वय 4)
 • जतीन सुरेश बर्वे (वय 4)
 • वैष्णवी सुनिल गायकवाड (वय19)
 • सुरेश भरत बर्वे (वय 35)