बालासोर  रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या २८८ वर

दोषी आढळलेल्याच्या विरोधात त्वरित आणि कठोर कारवाई करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश

बालासोर :-ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यानंतर रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९०० प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाकड़ून या ठिकाणी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावर जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. याशिवाय मोदींनी रूग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेतली. “अपघाताला कारणीभूत असलेल्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

ओडिशातील बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ २ जून संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. कोरोमंडला एक्स्प्रेसने मालगाडीला दिलेली धडक एवढी भयानक होती की एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. या अपघातात आता पर्यंत २५० जणांचा मृ्त्यू झाल्याचं वृत्त आहे. तर ९०० प्रवासी हे जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच एक्स्प्रेसचे डबे पलटल्याने काही प्रावासी त्याखाली अडकण्याची देखील भिती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणची रेल्वे वाहतूक सध्या थांबवण्यात आली आहे.

प्रशासनाकडून याठिकाणी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यासा सांगण्यात आलं असून राज्यस्तरीय मदतीसाठी एसआरसीला कळवण्यात आलं आहे. घसरलेले डबे रेल्वे रुळावरुन हटवण्याचं काम सुरु असून एकाच रुळावर दोन गाड्या आल्या कशा याचा तपास रेल्वेने सुरु केला आहे. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्याने हा अपघात घडला आहे. दोन्ही गाड्या एकाच रुळावर कशा आल्या याबात अधिकृत माहिती नसली तरी, सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशाला भेट दिली आणि बालासोर येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातानंतरच्या  बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी रेल्वे अपघातस्थळाला भेट दिली आणि या अपघातातील जखमींना ज्या रुग्णालयात दाखल केले आहे त्या रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

पंतप्रधान म्हणाले की विविध राज्यांमधील जे प्रवासी या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करत होते त्यांना या भीषण  अपघाताची झळ पोहोचली आहे. या अपघातातील जीवितहानीविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की या अपघातात जखमी झालेल्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरवण्यामध्ये सरकार  कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या शोकाकुल कुटुंबांच्या पाठिशी सरकार आहे, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

या अपघाताची योग्य पद्धतीने आणि वेगाने चौकशी करण्याचे आणि या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांविरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

त्यांनी ओदिशा सरकार, स्थानिक प्रशासन आणि स्थानिक जनतेची विशेषतः सध्या सुरू असलेल्या मदतकार्यामध्ये संपूर्ण रात्रभर काम करणाऱ्या युवा वर्गाची प्रशंसा केली. जखमींना मदत करण्याकरिता   रक्तदानासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद देणाऱ्या स्थानिक जनतेची देखील त्यांनी प्रशंसा केली. बचाव आणि मदत कार्याबरोबरच रेल्वेचा मार्ग  तातडीने पूर्ववत करण्यासाठी रेल्वे काम करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.  स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, आपत्ती निवारण दलाचे कर्मचारी आणि रेल्वे अधिकारी यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या भीषण  दुर्घटनेचा प्रभाव कमी करण्यासाठी  ‘ संपूर्ण सरकार’ या दृष्टीकोनावर भर दिला.

 आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावर जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. याशिवाय मोदींनी रूग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेतली. “अपघाताला कारणीभूत असलेल्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला.

जखमींची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, ओडिशा सरकार आणि येथील अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ज्या काही सुविधा आहेत, त्यांचा वापर करून जे काही करता येईल ते केलं. जास्तीत जास्त लोकांची मदत कशी करता येईल यासाठी येथील स्थानिकांनी पुढाकार घेतला. रक्तदान असो अथवा बचावकार्य. यामध्ये सहभागी असलेल्या स्थानिक तरूणांचा मी आभारी आहे.

तरूणाईचा मदतीचा हात

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

image.png

ओडिशा राज्यात झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. 

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ओडिशातील भयानक रेल्वे दुर्घटनेनंतर झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक झाली. अपघातग्रस्तांचे बचावकार्य, मदत आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याशी संबंधित सर्व पैलूंवर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.