औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामकरण वैजापुरात भाजप कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव

वैजापूर ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामांतराला अधिकृत मंजुरी दिल्याबद्दल भाजप – शिवसेना कार्यकर्त्यांनी  शुक्रवारी (ता.24) सायंकाळी येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.  

यावेळी आमदार रमेश पाटील बोरणारे, भाजपचे प्रशांत कंगले, ज्ञानेश्वर पाटील जगताप, कैलास पवार, पालिकेतील भाजपचे गटनेते दशरथ बनकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके,भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, शिवसेनेचे शहरप्रमुख पारस घाटे,  ज्ञानेश्वर टेके, नगरसेवक राजेश गायकवाड, गणेश खैरे, स्वप्निल जेजुरकर, गोकुळ भुजबळ, बजरंग मगर, भाऊलाल  सोमासे, प्रेमसिंग राजपूत, शैलेश पोंदे, सोनू राजपूत, गौरव दोडे, सागर राजपूत, महेश भालेराव, प्रदीप चव्हाण, सचिन दाढे, मधुकर कुहिले, निलेश पारख, सन्मित खनिजो, गिरीश चापानेरकर, जितू पवार, वैभव पवार, सुमित राजपूत, विश्वजित राजपूत, विनय संचेती आदी उपस्थित होते.