वैजापूर शहर व तालुक्यात दीड वर्षानंतर वाजली शाळेची घंटा, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन

Displaying IMG-20211004-WA0116.jpg

वैजापूर ,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहर व तालुक्यात तब्बल दीड  वर्षानंतर  सोमवार पासून पाचवी ते दहावीचे शालेय विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले.शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आंनद दिसत होता. थर्मल गण व ऑक्सिमीटरने विद्यार्थ्यांची करण्यात आली.सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित अंतर ठेवून शाळांमधील वर्ग सुरू करण्यात आले.

येथील नगरपालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात न.प चे माजी शिक्षणाधिकारी ठाकूर धोंडिरामसिंह यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची कोरोनापूर्व तपासणी करून शाळा सुरू झाली.विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन वर्गात प्रवेश देण्यात आला. गाणी व कविता सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही यावेळी करण्यात आले.अनेक दिवसानंतर शालेय मित्रांची भेट झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.वर्गात एक बेंचवर  एक विदयार्थी बसवून शिक्षक त्यांना शिकवित होते.मुख्याध्यापक जी.जी.राजपूत,शिक्षक बी.बी.जाधव, शिक्षिका सुनीता वसावे,वैशाली पगारे,सुवर्णा बोर्डे,लता सुखासे आदी शाळेत हजर होते.