पश्चिम महाराष्ट्रासारखी होणार उस्मानाबादची प्रगती विकासाभिमूख कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत

शिवजन्मोत्सवनिमित्त पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप

उस्मानाबाद,,१९ फेब्रुवारी /प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हयाचा विकास पश्चिम महाराष्ट्रासारखा करण्यास शासन कटीबध्द असून लवकरच उस्मानाबादची ख्याती एक विकसीत जिल्हा म्हणून होईल,तसेच विकासाभिमूख कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाचे अभिषेक व हेलीकॉप्टरव्दारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाप्रंसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणा जगजितसिंह पाटील,आ.कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत आदी उपस्थित होते.

डॉ.सावंत म्हणाले महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्त मी आपणास सांगु इच्छितोकी उस्मानाबाद जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबध्द असून जिल्हयास निधीची कमरता पडू देणार नाही,तसेच महाराष्ट्र शासनही उस्मानाबादच्या प्रगतीसाठी सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

या अभिषेक व पुष्पवृष्टी सोहळयास शहर भरातून शिवप्रेमींनी गर्दी केली होती.मोटार सायकल रॅली,ऑटो रिक्षा रॅली आणि पारंपारिक नृत्यही यावेळी सादर करण्यात आले या प्रसंगी सर्व वयोगटातील नागरिक, महिला,मुले मोठया संख्येने उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवनिमित्त पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते साजा रोड येथे भवानी चौकात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप करण्यात आले.

यावेळी पालकमंत्र्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले व उपस्थित शेतकरी आणि नागरिकांसोबत चर्चा केली. यावेळी सामुहिक आरती करण्यात आली या आरतीमध्ये परीसरातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थिती नोंदवली.

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव निमित्त प्रथमोपचार किटचे वाटप

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते  शहरातील रामनगर येथे प्रथमोपचार किट (फर्स्ट एड किट) चे वाटप करण्यात आले.

यावेळी पालकमंत्र्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी सामुहिक आरती करण्यात आली या आरतीमध्ये परीसरातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थिती नोंदवली.

वैद्यकीय उपकरण व मोबाईल क्लिनिकचे लोकार्पण

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांंनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन सी.एस.आर अंतर्गत प्राप्त वैद्यकीय साहित्य,उपरकणे या बरोबर मधु मेह उच्च रक्तदाब,फिट्स,मेनोपॉझ (रजो निवृत्ती) संदर्भातील क्लिनिकचे उदघाटन केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.उज्वला सरोदे-गवळी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी मोबाईल मेडिकल क्लिनिकच्या व्हॅनला हिरवी झेंडी दाखवत त्याचे लोकार्पण केले.तत्पूर्वी डॉ.सावंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सोयी सुविधांची सखोल पाहणी केली, यावेळी येथील डॉक्टर्स परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या कामकाजाबाबत माहिती विचारली तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपस्थित अधिकाऱ्यांना या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या.